तंबाखूमुक्ती अभियानासाठी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी काढली जनजागृती रॅली
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 245 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग
माढा / प्रतिनिधी -जिल्हा परिषद सोलापूर व सलाम बाॅम्बे फाऊंडेशन आणि माढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारूती फडके व विस्ताराधिकारी बंडू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी सध्या सर्वञ तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न अभियान राबवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून कापसेवाडी-हटकरवाडी येथील दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री संत गाडगेबाबा माध्यमिक माध्यमिक विद्यालयातील 245 विद्यार्थ्यांनी गावातून प्रबोधनपर घोषणा देत वाजतगाजत रॅली काढून ग्रामस्थांची जनजागृती केली.
या रॅलीचा शुभारंभ मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सुनील खोत यांनी केले.
या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या एक दोन तीन चार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ करू हद्दपार,तंबाखू खाणे सोडा अन् भारत देश जोडा, तंबाखू खाणे म्हणजे कॅन्सरला आमंत्रण,तंबाखूची नशा करी जीवनाची दुर्दशा अशा अनेक घोषणांनी गावचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.रॅलीमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेले बॅनर व पोस्टर्स ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते.
याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करीत शाळेच्या तंबाखूमुक्ती अभियानास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण, राजेंद्र खोत,पोलीस पाटील रामकृष्ण धावणे, भानुदास धावणे,मुख्याध्यापक राजकुमार क्षिरसागर, आण्णासाहेब पाटील, प्रसन्न दिवाणजी,अनिल तावस्कर, उज्वला क्षिरसागर,तुकाराम कापसे,तनुजा तांबोळी, प्रविणकुमार लटके,शिवाजी भोगे, सुनिल खोत,सचिन क्षिरसागर, सुधीर टोणगे,लहु गवळी,सागर राजगुरु यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि तीन शाळेतील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment