डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय माध्यमिक शिक्षक परिषदेचा जिल्हास्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या हस्ते स्वीकारताना किरण चव्हाण, अर्चना चव्हाण, शेजारी अंबादास रेडे, जीवन यादव व मान्यवर.
माढा, ता. : जनसेवा हायस्कूल बार्शी येथील माध्यमिक शिक्षक किरण ज्ञानदेव चव्हाण यांना
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय माध्यमिक शिक्षक परिषद सोलापूर शाखेचा जिल्हास्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बार्शीतील जनसेवा हायस्कूल येथे वीस वर्षांपासून माध्यमिक शिक्षण म्हणून कार्यरत असलेले किरण चव्हाण यांना पत्नी अर्चना चव्हाण यांच्यासमवेत पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्काराबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अंबादास पोकळे, उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, सचिव प्रा. डॉ. विलास गुंड, मुख्याध्यापक सतीश गुंड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जीवन यादव, जिल्हा सचिव प्रा. लक्ष्मण महाडिक, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, विस्ताराधिकारी अशोक भांजे, मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. संजय जाधव, शहराध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, पिडीआरएसपीचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास रेडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निर्मला शेळवणे, शहराध्यक्षा अभिंजली जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हरिदास गवळी, मेस्टाचे जिल्हाध्यक्ष गणेश नीळ, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रा. दिपक देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्र्य मस्के, जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम साठे, जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक पवार, जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, माढा तालुकाध्यक्ष मोहन नलवडे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष बापूजी निंबाळकर, मंगळवेढा तालुकाध्यक्ष लक्ष्मण हेंबाडे, राजेंद्र काकडे, अविनाश हजारे, विवेक पाटील, सतिश नागणे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment