माढ्याच्या जिल्हा परिषद प्रशालेस दुरुस्तीसाठी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर- रणजितसिंह शिंदे..
माढा /प्रतिनिधी माढ्यातील जिल्हा परिषद प्रशालेच्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी समग्र शिक्षा अभियानातून 60 लाख 2 हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
माढ्यातील जिल्हा परिषद प्रशाला जिल्हा परिषदेच्या वतीने चालवली जाणारी एकमेव माध्यमिक प्रशाला आहे. 958 हून अधिक पटसंख्या असणाऱ्या या प्रशालेत एकूण 31 वर्गखोल्या आहेत. मात्र नुकतेच झालेल्या स्ट्रक्चर ऑडिट नुसार 29 वर्गखोल्यांची मोठी दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले.
समग्रशिक्षा अभियानातून वर्ग खोल्यांच्या मोठ्या दुरुस्तीसाठी 99 लाख 98 हजारांचा अंदाज पत्रक तयार केले. मुख्य अभियंत्यांनी समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र प्रार्थमिक शिक्षण परिषद मुंबई ज्यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल केला होता.
यानुसार सन 2019 20 च्या वार्षिक कार्य योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी चार कोटी 53 लाखाचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी माढ्यातील प्रशालेच्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी साठ लाख 2 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यासाठी आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार नाना भांगे यांनी पाठपुरवठा केला.

No comments:
Post a Comment