माढ्याचे डॉ. राजकुमार आडकर एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण..... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2019

माढ्याचे डॉ. राजकुमार आडकर एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण.....




माढ्याचे डॉ. राजकुमार आडकर एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण.....                                      

            माढा शहरातील सुयश हाॅस्पीटलचे डॉ.राजकुमार आडकर यांनी शरीर रचना शास्त्र  या विषयामध्ये एम.डी.हि पदवी धारण केली.
कर्नाटक राज्यातील राजीव गांधी एज्युकेशन सोसायटी मेडिकल कॉलेज रोन,गदग येथे त्यांनी आयुर्वेदातील शरीर रचना शास्त्र या विषयाकरिता सन2016 मध्ये प्रवेश घेतला होता.2019 मध्ये झालेल्या अंतिम परिक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन करत एम.डी.हि डिग्री मिळवली.यानंतर माढा परिसरातील रूग्णांना आपल्या शिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा अल्प दरात देण्याचा त्यांचा मानस आहे. यापूर्वी त्यांनी व्यसनाधीन रुग्णांना  व्यसनमुक्त केले आहे. व  तीन मुली झाल्यास  तिसऱ्या मुलीचे  प्रसूती चा खर्च  पूर्ण मोफत करतात. हे त्यांचे कौतुकास्पद काम आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे माढा शहर आणि परिसरातील हितचिंतकाकडून, ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages