विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 15, 2019

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
सांगोला/प्रतिनिधी- १४ डिसेंबर रोजी विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे संगणकशास्त्र विभाग व प्राणिशात्र विभागामध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. सदर परिषदेचा उदघाटन समारंभ सकाळी १०:१५ वाजता सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते व संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ भाई गणपतरावजी देशमुख व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस,संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे यांनी केले त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा इथली लोकं सोन्याप्रमाणे आहेत असे ही त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते व संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ भाई गणपतरावजी देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि राष्ट्रीय परिषदेचा विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे. सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याबद्दल व शेतीच्या पाण्याबद्दल  त्यांनी सविस्तर आपले मनोगत व्यक्त केले. मा.आ.डॉ भाई गणपतरावजी देशमुख यांच्या भाषणानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी आपले शिक्षण व संशोधन हे नुसते पैसे कमवण्यासाठी असू नये तर त्याचा उपयोग समाज्यातील प्रत्येक घटकाला झाला पाहिजे असे सांगितले. फूड प्रॉडक्ट, महत्वाची पिके, वन्य प्राण्यांचे संरक्षण, स्टुडन्ट रिसर्च प्रोजेक्ट, एम.ओ.यू , नाविन्यपूर्ण विचार अशा अनेक महत्वाच्या विषयावर त्यांनी आपले विचार प्रकट केले. कुलगुरू यांच्या भाषणानंतर आभार प्रदर्शन संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कोळवले एच.डी यांनी केले.
                         उदघाटन समारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर  संगणकशात्र विभाग व प्राणीशास्त्र विभागाची तांत्रिक सत्रे स्वतंत्रपणे पार पडली. संगणकशास्त्र विभागाची परिषद  " इनोव्हेटिव्ह पेडागॉजी अँड इफेक्टिव्ह ब्लेंडेड लर्निंग" या विषयावर पार पडली. संगणकशास्त्र विभागाच्या तांत्रिक सत्राच्या पहिल्या भागात किनोट स्पिकर म्हणून जी.एफ.जी.सी बेंगलोर,कर्नाटक विद्यापीठातील प्रा.संगय्या स्वामी यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी अध्यापनातील आव्हाने, लिडरशिप स्किल, लाईफ स्किल, पेडागॉजीकल चॅलेंजेस, टीचिंग टेक्निक, नाविन्यपूर्ण अध्ययन व अध्यापन अशा अनके विषयावर त्यांनी सखोल माहिती सांगितली. सदर सत्राला चिअर पर्सन म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ मेन्ते आर.एस यांनी काम पाहिले. दुपारी १:१५ ते २ या वेळेत लंच ब्रेक घेण्यात आला.  त्यानंतर २ ते ४:१५ या वेळेत तांत्रिक सत्राच्या दुसऱ्या भागात किनोट स्पिकर म्हणून 'एस.आर.टी.एम.यू सब कॅम्पस लातूर' चे प्रा. डॉ. हुंबे व्ही.टी यांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी 'मेसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस' या विषयावर मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी  ऑनलाईन ओपन कोर्सेस, सबजेक्ट असायमेंट, लर्नर एंगेजमेंट, ए.आय.सी.टी.ई , एन.पी.टी.ई.एल, एफ.डी.पी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.तांत्रिक सत्राच्या दुसऱ्या भागाला चिअर पर्सन म्हणून सिंहगड कॉलेज, सोलापूर मधील प्रा. अमोल पाठक यांनी मार्गदर्शन केले.
         प्राणीशात्र विभागाची परिषद "रीसेंट ट्रेंड इन लाईफ सायन्स" या विषयावर पार पडली. प्राणीशात्र विभागातील तांत्रिक सत्राच्या प्रथम भागात किनोट स्पीकर म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशात्र  विभागातील प्रा.डॉ. भिलावे एम.पी यांनी "रीसेंट ट्रेंडस इन बायॉलॉजी " या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी नामशेष होत चाललेल्या प्रजाती नष्ट का झाल्या यावरती वेगवेगळी उदाहरणे देऊन कारनमीमांसा केली. या सत्राला चिअर पर्सन म्हणून प्रा. डॉ. दौले मॅडम या होत्या तर आभार प्रदर्शन डॉ गाडेकर सर यांनी केले. तांत्रिक सत्राच्या दुसऱ्या भागात किनोट स्पिकर म्हणून  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मिलिंद सरदेसाई यांनी "अजंटा वेरूळ येथील बांधकामामध्ये गांजा या वनस्पतीच्या वापरासंबंधी नव्याने केलेले संशोधन" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अजंटा वेरूळ येथील १०० लेण्यांच्या पैकी ३४ लेण्यांच्या बांधकामाचे रहस्य त्यांनी सांगितले. युनिस्कोच्या वर्ड हेरिटेज सेंटर संबंधित प्रकल्पामध्ये निवड झालेल्या संशोधनामध्ये झालेली संशोधने त्यांनी यावेळेस ऐकवली. या  सत्राला चीअरपर्सन म्हणून प्रा. डॉ. सौ सविता सातपुते, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज या उपस्थित होत्या. तांत्रिक सत्राच्या तिसऱ्या भागात किनोट स्पिकर म्हणून  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक व माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. कांबळे एस.एस यांनी "डाळिंब या पिकावरील तेल्या तसेच तत्सम बुरशीजन्य रोगांच्या पिकांवरील उपाय " या विषयी सखोल माहिती सांगितली. या सत्राला चीअरपर्सन म्हणून डॉ. सुभाष इंगोले दत्ताजी कदम महाविद्यालय इचलकारंजी हे उपस्थित होते. 
                निरोप समारंभाचा कार्यक्रम ४:३० ५:४५ या वेळेत पार पडला, निरोप  समारंभाचा कार्यक्रम संस्थेचे सचिव विठ्ठलावर शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे, प्रा. डॉ. गुरव आर. व्ही (संचालक,विदयार्थी कल्याण, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर),  जी.एफ.जी.सी बेंगलोर,कर्नाटक विद्यापीठातील प्रा. संगय्या स्वामी, संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कोळवले एच.डी, प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ खंदारे एस.एन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमामध्ये पोस्टर मेकिंग मध्ये प्रथम आलेले मत्ताल एस.आर, व्दितीय मुजावर, तृतीय रासकर,शिंदे, केदार यांचा सत्कार करण्यात आला. ओरल प्रेजेंटेशन मध्ये प्रथम लीना खाडे, व्दितीय पूजा पैलवान, तृतीय नारायणकार राजेंद्रकुमार व उत्तेजनार्थ रोहिनी शिंदे, मोनिका होवाळ, तृप्ती धांडोरे,अनुराधा इंगोले व ग्रुप या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
                            राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. खंदारे एस.एन, संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कोळवले एच.डी, बी.सी.ए विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सरगर बी.आर, बी.एस्सी(ई.सी.एस) विभागाचे विभाग प्रमुख प्रा. भानवसे डी.पी, एम.एस्सी (संगणकशास्त्र) विभागाचे विभाग प्रमुख प्रा. निलेश रसाळ, प्रा.शेख जे.यु, प्रा. लवटे पी.एम, प्रा. कोळवले डी.एस, प्रा. शेख एन.एस, प्रा. शिंदे डी.आर, प्रा. मानगावे डी.आर, प्रा. रणदिवे एस.आर, प्रा. टाकळे ए.बी, प्रा. व्हनमाने एस.एन, प्रा. कसबे एस.व्ही, प्रा. धुरे एम.डी, प्रा. कु मेटकरी एम.एस,  कादरी एम.जे,  गव्हाणे एस.बी, श्री. निसार मुलाणी,  वसंत गुसाळे,  राजू सादिगले, धनाजी गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages