शैक्षणिक सहलीस जाणा-या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2019

शैक्षणिक सहलीस जाणा-या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी





शैक्षणिक सहलीस जाणा-या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी 

शिक्षक व पालकांमधून विधायक  उपक्रमाचे होतेय कौतुक 

माढा - शासनाच्या शिक्षण विभागाच्या नवीन धोरणानुसार शैक्षणिक सहलीसाठी जाणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट तपासणी व अपघाती विमा उतरणे बंधनकारक आहे.सध्या सर्वञ सहलीचा मोसम सुरू असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासणीकरिता किमान 50 रूपये खर्च येतो परंतु  मानेगावच्या स्वरा क्लिनीकल लॅबोरेटरीचे संचालक देवीदास माळी यांनी सहलीस जाणा-या कापसेवाडीच्या माध्यमिक विद्यालयातील 60 विद्यार्थ्यांचे रक्तगट मोफत तपासून ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे त्यामुळे या विधायक उपक्रमाचे शिक्षक व पालकांमधून कौतुक होत आहे. 

माढा तालुक्यातील कापसेवाडी- हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल कोकण दर्शनासाठी जाणार आहे याची पूर्वतयारी म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण व सहशिक्षक शिवाजी भोगे यांनी विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करिता स्वरा लॅबोरेटरीचे संचालक   देवीदास माळी यांना संपर्क साधला असता त्यांनी एका विद्यार्थ्यांस 50 रूपये तपासणी फी सांगितली तेंव्हा शिक्षकांनी त्यांना विनंती केली की, ग्रामीण भागातील गोरगरीब व कष्टकरी शेतक-यांची मुले आहेत.एकतर त्यांना सहलीचा खर्च पेलवत नाही आणि दुसरीकडे रक्तगट तपासणी व अपघाती विमा उतरणे यासाठी ज्यादा रक्कम खर्च करावी लागत आहे तेंव्हा या बाबींचा सहानुभूतीने विचार करून संचालक देवीदास माळी यांनी सहलीला जाणा-या सर्व  विद्यार्थ्यांचे रक्तगट मोफत तपासून देऊन एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि इतरांनाही प्रेरणादायी आहे. 

या सहकार्याबद्दल विद्यालयाच्या   वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि आभार मानले.याप्रसंगी मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण, तुकाराम कापसे,प्रविण लटके,तनुजा तांबोळी,शिवाजी भोगे, सुनील खोत,सचिन क्षीरसागर,सुधीर टोणगे,लहू गवळी,सागर राजगुरु,गणेश सुतार यांच्यासह विद्यार्थ्यी उपस्थित होते.

- चौकट- चालू वर्षांत शैक्षणिक  सहलीस जाणा-या मानेगाव व पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट मोफत तपासून देऊन गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व सहकार्य करण्याच्या दृष्टीने हा विधायक उपक्रम हाती घेतला असून ज्या विद्यालयाची सहल जाणार आहे त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन मानेगावच्या स्वरा क्लिनीकल लॅबोरेटरीचे संचालक देवीदास माळी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages