गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त जुळे सोलापुरात कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 17, 2019

गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त जुळे सोलापुरात कार्यक्रम





















गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त जुळे सोलापुरात कार्यक्रम
सोलापूर ,दि.१८(प्रतिनिधी )जुळे सोलापूर  येथे संतश्रेष्ठ गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या  पुण्यतिथीचे औचित्य साधून  सालाबादाप्रमाणे यंदाही परीट महासंघाच्यावतीने  शुक्रवार दि.२०रोजी सकाळी ९ वाजता   गाडगेबाबा यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता  अभियान राबविण्यात येणार आहे .सकाळी १०वाजता रक्तदान शिबिर . सांयकाळी ५.३० वाजता  सुगमसंगीत भक्तीगीतांचा कार्यक्रम.संत शिरोमणी गाडगेबाबा या विषयावर  व्याख्यान . आणि  यानंतर पुरस्कार  वितरण  सोहळा.यामध्ये समाजभूषण- दत्तात्रय काटकर (सोलापूर ).बाबुराव  घोडके(औराद). आदर्श  माता-सरस्वती  ननवरे(टेंभुर्णी).मंगल आडसुळ(सोलापूर ).समाजरत्न-हरिश्चंद्र राऊत(वैराग).कैलास राऊत,(सोलापूर ).युवाउद्योजक-राहुल काटकर.विनायक  संगपाळ.यांचा  शाल श्रीफळ आणि स्मृती  चिन्ह  देऊन प्रमुख  मान्यवरांच्या हस्ते गौरव  करण्यात   येणार  आहे . शेवटी  कार्यक्रमाची  सांगता महाप्रसाद वाटपानी होणार  आहे  तरी समाजबांधवानी मोठ्या संख्येने  उपस्थित  राहावे  असे आवाहन  गाडगेबाबा उत्सव समितीच्यावतीने करण्यात येत आहे .
Attachments area

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages