महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आ.कु.प्रणितीताई शिंदे व आ.भारतनाना भालके यांचा समावेश करण्यासाठी श्री विठ्ठलास प्रार्थना व आरती करून घातले साकडे
पंढरपूर -महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होवून शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येवून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात स्थापन केली. महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार दि.24 डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून कार्यकुशल, कार्यतत्पर व एकमेव कॉंग्रेसच्या महिला हॅट्रीक आमदार कु.प्रणितीताई शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हॅट्रीक आमदार भारतनाना भालके यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान मिळावे म्हणून संत नामदेव पायरी येथे सोलापूर जिल्हा कॉंग्रेस प्रणित ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे- शिंदे , सौ.संध्या बडवे यांच्यावतीने व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते श्री विठ्ठलास प्रार्थना करून आरती करण्यात आली व साकडे घालण्यात आले.
यावेळी पंढरपूरचे कॉंग्रेस शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर भोसले, सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे माजी उपाध्यक्ष रफिक शेख, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, त्याचप्रमाणे जिल्हा किसान सभा महिला अध्यक्षा शुभांगी जाधव, शहर सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष हुंगे-पाटील, शेगावचे अटकळे, ओबीसी सेलचे संतोष ताठे, आनंद भागानगरे, देवानंद इरकल यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment