सोलापूर जिल्हास्तरीय खो-खो क्रिडा स्पर्धेत खंडोबाचीवाडी शाळा अजिंक्य
मोहोळ [ प्रतिनिधी ] जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर जिल्हास्तरीय खो-खो क्रिडा स्पर्धा दि. १९ रोजी मुलांच्या सुलाखे हायस्कूल बार्शी व दि. २१ रोजी मुलींच्या न्यू इंग्लिश स्कुल सांगोला येथे पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाचीवाडी ता. मोहोळ संघाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला दबदबा कायम ठेऊन अजिंक्य पद पटकावले आहे यामध्ये खो-खो मध्ये मोठा गट मुले प्रथम क्रमांक, मोठा गट मुली प्रथम क्रमांक, लहान गट मुले द्वितीय क्रमांक घेऊन संघाने जिल्ह्यात खो - खो मध्ये आपला दबदबा कायम ठेऊन पुन्हा एकदा सिद्ध केले की खो - खो ची पंढरी खंडोबाचीवाडीच आहे तसेच लहान गट मुले लगंडी जिल्हा प्रथम क्रमांक आला.
या यशस्वी विद्यार्थ्याना किशोर गुंड, महेश राऊत, हरी शिंदे, शिवाजी नरके-पाटील महादेव गुंड, यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन माजी आमदार राजनजी पाटील, लोकनेते शुगरचे चेरमन बाळराजे पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मुख्याध्यापक धायगुडे गुरूजी, शिरामे सर, तानाजी गुंड सर,चव्हाण सर,ढोले सर, ढोले मॅडम, बोडके सर, गुंड मॅडम व सर्व ग्रामस्थ खंडोबाचीवाडी यांनी केले.

No comments:
Post a Comment