बार्शी - जेष्ठ समाजसेवक सुभाष उपळकर यांचे निधन
[ बार्शी प्रतिनिधी ]- येथील पांडुरंग बुक डेपो चे मालक आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष मुकिंदा उपळकर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी तीव्र ह्र्दय विकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले. सुभाष उपळकर हे राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. आणीबाणी च्या काळात ते ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुरांणा , भाई वैद्य , मधु दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते तर ते बार्शीतील एक परिवर्तन वादि कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांनी बार्शी नगर परिषद शिक्षण मंडळ सदस्य , जगदंबा देवस्थान भवानी पेठ येथे पंच, पांगरी विविध कार्यकारी सोसायटी सदस्य अश्या जबाबदारी समर्थ पणे पेलल्या आहेत. त्यांच्या मालकीचे सोमवार पेठ येथील पांडुरंग बुक डेपो हे चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. सुभाष उपळकर यांच्या पाठी तीन मुले. मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाची बातमी समजताच बार्शीचे माजी आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल , पुणे पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार शरद पाटील, आनंदवन येथील विकास आमटे यांनी ह्ळहळ व्यक्त केली. तर त्यांच्या अकस्मात निधनाने बार्शीतील एक समाजवादी खरा चेहरा हरपला अशी भावना दिलीप सोपल यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment