भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात निदर्शने व सभा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 22, 2019

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात निदर्शने व सभा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात निदर्शने 


 बार्शी प्रतिनिधी - भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन, आयटक, किसान सभा तसेच बार्शीतील संविधाननिष्‍ठ संघटनांच्या वतीने दिनांक 19 डिसेंबर गुरूवार रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या समोर भारतीय नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात तिव्र निदर्शने व सभा घेण्यात आली. यावेळी आंदोलनात नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी अंदोलनाची भूमिका मांडताना कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्य सदस्य काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, ‘‘भारत देश हा गंगा जमूनी संस्कृतीचा देश आहे, देशात उभी फूट पडून हिंदूत्ववादाचा अजेंड पूढे जावा यासाठी, नागरिकत्व संशोधन कायदा भाजपाने केला आहे, जगातील कोणताही माणूस कोणत्याही देशात राहील या युनोच्या कायद्याला गुंडाळून तसेच डाॅ. बाबासाहेबांची घटनाच मान्य नसल्याने ती संपण्याच्या उद्देशाने हे कटकारस्थान रचले आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीही काम न केलेली आरएसएस व भाजपावाले देशातील जनतेला नागरिकत्व सिध्द करण्यास सांगत आहेत,  आठरा देशात, देशातील सर्व विद्यापीठात याचा विरोध होत आहे, विरोध कराणारांचा, बुध्दीजीविंचा अमानुश छळ व अटक सत्र सुरू आहे, मुठभरांचा ब्राम्हणवादी अजेंडा आरएसएस ने स्वीकारून संपूर्ण देशात विष पेरण्याचे, देशाला वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे, इंग्रजांपूढे माफी मागणारे आज देशप्रेम शिकवत आहेत, याचा आम्ही तिव्र विरोध करतो, देशाची अखंडता व एकता यासाठी धर्मांधतेच्या विरोधी तिव्र लढाई लढत राहीली जाईल, काॅम्रेड अमर शेखांच्या आई मुनेरबी यांच्या शिकवणू प्रमाणे हिंदू-मुस्लीम एकता अखंड बार्शीत कायम राहील’’.

सभेचे सुत्रसंचलन कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव काॅमे्रड प्रविण मस्तुद यांनी केले, आंदोलनात काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, काॅम्रेड शौकत शेख, काॅम्रेड भारत भोसले, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅ. शाफीन बागवान, काॅ. भारत पवार, काॅ.पवन आहिरे, शुभम कांबळे, तूशार कांबळे, लहू आगलावे, धनाजी पवार, शारदा पंढरपूरे, मुमताज शेख, गंगावणे उपस्थित होते, यावेळी आॅल मुस्लीम समाज व बार्शी शहर व तालुका मुस्लिम एल्गार मोर्चा, उडान फाउंडेशनचे जमील शेख, अॅड. राजू शेख, आयुब शेख, बानपा उपनगराध्यक्ष कृष्‍णराज बारबोले, अमर शेख कला अकादमीचे वाहेद शेख, राष्‍ट्‍र्‍वादी काॅंग्रेसचे विक्रम सावळे, नागेश अक्कलकोटे, युवक काॅंग्रेसचे निखील मस्के, काँग्रेस आयचे तानाजी जगदाळे, रमजान शेख, बालाजी डोईफोडे, वंचित आघाडीचे विवेक गजशिव, धनंजय जगदाळे यांची भाषणे झाली व आंदोलनाला जाहीर पाठींबा नोंदविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages