शुगरकेन प्रोड्युसर्स सोसायटीमध्ये क्लार्क ने एक लाख रुपयाचा अपहार ; टेंभुर्णी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 22, 2019

शुगरकेन प्रोड्युसर्स सोसायटीमध्ये क्लार्क ने एक लाख रुपयाचा अपहार ; टेंभुर्णी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल

शुगरकेन प्रोड्युसर्स सोसायटीमध्ये क्लार्क ने एक लाख रुपयाचा अपहार; टेंभुर्णी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल

 टेंभुर्णी ( प्रतिनिधी) :- माळीनगर येथील  शुगरकेन प्रोडयूसर्स विविध कार्यकारी  सोसायटी लिमिटेड माळीनगर यांची टेंभुर्णी मार्केट यार्ड मध्ये खत विक्रीचे दुकान आहे त्यामध्ये क्लार्क  दिपक संजय धतींगे वय २५ वर्षे  रा.  टेंभुर्णी यांनी सुमारे १ लाख ६ हजार रुपये चा अपहार केला असल्याची फिर्याद  व्यवस्थापक अनिल नामदेव गिरमे वय ५५ वर्षे रा.माळीनगर यांनी टेंभुर्णी पोलीसांत दि.२१ डिसेंबर रोजी  दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की  शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.  माळीनगर यांची टेंभुर्णी मार्केट यार्ड येथे शाखा असुन तेथे रायायनीक खते विक्रीचा व्यवसाय चालतो.तेथे कामकाज पाहणारा क्लार्क  दिपक
संजय धतिंगे (वय-२५) रा.टेभुर्णी ता.माढा जि.सोलापुर हा दिनांक २१ ऑक्टोबर २०१४ पासुन कामास होता.दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ पासुन
क्लार्क दिपक संजय धतिंगे याच्याकडे संस्थेचे टेंभुर्णी येथील आॅफिस कामकाज व खतविक्री करणेकरीता त्याचे ताब्यात पुर्ण चार्ज
दिला होता.

दि.४ ऑक्टोबर   २०१९ ते  दि. १३ नोव्हेंबर   २०१९ या कालावधीत टेंभुर्णी  येथील शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सहकारी
सोसायटी लि माळीनगर शाखा टेभुर्णी येथील पुर्ण चार्ज क्लार्क दिपक संजय धतिंगे याचे ताब्यात होता. दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पुर्वी
दिपक धतिंगे याचा अपघात झाल्याने शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि माळीनगर, शाखा टेंभुर्णी येथील
पुर्ण चार्ज राजमोहन चंद्रभान शिंदे रा.माळशिरस ता माळशिरस याच्याकडे देण्याचा असल्याने दिपक संजय धतिंगे यांना समक्ष
बोलावुन त्याचे समोर व्यवस्थापक गिरमे  व शिपाई पांडुरंग जनार्धन सकट रा.माळशिरस ता.माळशिरस गोडावुन मधील रसायनिक खत व रोख रक्कम
याची तपासणी केली असता रसायनिक खत विक्री केलेली रोख रक्कम ९०९३९ /- रु भरणे आवश्यक होते परंतु रोख रक्कम रू. १५०००/
 शिल्लक होती. त्यामध्ये ७५९३९/- रु रक्कम कमी होती व रसायनिक खताची तपासणी केली असता  ३०२११/- रु किमतीचा माल कमी मिळुन आला.  रोख रक्कम व रसायनिक खत हा  शाखेतील क्लार्क दिपक संजय धतिंगे याने स्वताचे फायद्यासाठी
अविश्वासाने अपहार केला आहे.
,  त्याने रोख रक्कम रू. ७५  हजार  ९३९  व ३० हजार २११ रुपये  एवढ्या  किमतीचा रासायनिक खत असा एकुण १०६१५० रु स्वताचे
फायद्यासाठी अविश्वासाने अपहार केला आहे अशा आशयाची तक्रार   त्याच्या विरुद्ध व्यवस्थापक अनिल गिरमे यांनी टेंभुर्णी पोलिसांत दिली असुन पुढील तपास पो.हे.काॅ.भोसले हे करीत  आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages