शिरढोण ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत परिचारक गटाच्या सौ.सुजाता लोखंडे विजयी
[पंढरपूर/प्रतिनिधी] तालुक्यातील शिरढोणयेथील एका ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ग्रामपंचायत पोटनिवडणुक जाहिर झाली होती. यामध्ये परिचारक पार्टी आणि भालके-परिचारक-काळे गटात लढत झाली होती. परिचारक गटातून सौ.सुजाता मोहन लोखंडे तर विरोधी भालके-परिचारक-काळे गटातून सौ.शितल समाधान लोखंडे या निवडणुकीत उभे होते. दोन्ही बाजूंनी आपआपला उमेदवार निवडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केला गेला. सौ.सुजाता मोहन लोखंडे यांना 242 मते तर विरोधी सौ.शितल समाधान लोखंडे यांना 215 मते पडली.
यामध्ये परिचारक पार्टी कडून निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या सौ सुजाता मोहन लोखंडे यांचा सत्ताविस मतांनी दणदणीत विजय झाला. हि पोटनिवडणुक म्हणजे एक प्रकारची रंगीत तालीम समजली जात होती कारण थोड्याच दिवसात ग्रामपंचायत निवडणुक होणार आहे त्यामुळे आप आपसातील मतभेद विसरून पांडुरंग परिवारातील सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन हि निवडणूक प्रतिष्ठेची करून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.

No comments:
Post a Comment