पाचेगाव बुद्रुकच्या सरपंचपदी प्रमोद दौंड यांची बिनविरोध निवड
पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथील आदर्श ग्रामविकास आघाडीचे सरपंच दगडु बिले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी परिवर्तन विकास आघाडीचे प्रमोद दत्तात्रय दौंड यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच प्रमोद दौंड,माजी सरपंच रमेश ढेमरे,माजी सरपंच दगडु बिले,उपसरपंच मच्छिंद्र कांबळे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मंडले,ग्रामपंचायत सदस्या रंजना सरगर,ग्रामपंचायत सदस्या प्रभावती घोडके,ग्रामपंचायत सदस्या ताराबाई बिले व ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कोळा मंडलाधिकारी जी.के.व्हनकडे यांनी काम पाहिले.कोळा मंडलाधिकारी जी.के.व्हनकडे,जुनोनी मंडलाधिकारी बाळासाहेब वाघमारे,ग्रामसेवक ए जी पोरे,संगणक परिचालक संजय खरात,लिपिक शशी मंडले,शिपाई अशोक दौंड,शिपाई अशोक कांबळे यांनी निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.पोलीस नाईक चौगुले,पोलीस नाईक थिटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

No comments:
Post a Comment