श्री.शिवाजी महाविद्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज महाविदयालय असे नामकरण करा वंचित बहुजन आघाडीने दिले संस्थेला निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

श्री.शिवाजी महाविद्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज महाविदयालय असे नामकरण करा वंचित बहुजन आघाडीने दिले संस्थेला निवेदन







श्री.शिवाजी महाविद्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज महाविदयालय असे नामकरण करा



वंचित बहुजन आघाडीने दिले संस्थेला निवेदन



बार्शी प्रतिनिधी -


येथील शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या श्री. शिवाजी महाविद्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज महाविदयालय असे नामकरण करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संस्थेच्या श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी च्या कार्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात शिवाजी महाविद्यालयाचे नाव  हे जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आले असेल तर या महाविद्यालयाचे शिवाजी हे नाव विस्तारित करून छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय असे करावे अशी मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. ते आदर्श असून त्यांचा एकेरी उल्लेख म्हणजे त्यांचा अवमान आहे त्यामुळे संस्थेने जनमानसाची मागणी म्हणून या महाविद्यालयाचे नाम विस्तार लवकरात लवकर करावे. सदरचे निवेदन संस्थेच्या वतीने एस.ए पाटील यांनी स्वीकारले तर निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष धनंजय जगदाळे, बालाजी डोईफोडे, परमेश्वर कदम, आनंद दगडे, अश्वकुमार आहिरे, किशोर ढोले, संतोष भोंडे, तात्यासाहेब चौधरी , अतुल घोडके आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages