शिरढोण ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये सौ.सुजाता मोहन लोखंडे यांचा दणदणीत विजय
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत पांडुरंग बहुजन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार सौ.सुजाता मोहन लोखंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नुतन ग्रामपंचायत सदस्या सौ. लोखंडे या आ.परिचारक गटाच्या असुन त्यांनी आ. भालके गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ.शितल समाधान लोखंडे यांना 27 मतांनी पराभुत केलं.
शिरढोण ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मधील पोटनिवडणुकीसाठी दि. 8 डिेसेंबर 2019 रोजी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल दि. 9 डिसेंबर रोजी जाहीर झाला. मतमोजणी नंतर पुढीलप्रमाणे निकाल घोषीत करण्यात आला. आ. भालके गटाच्या उमेदवार सौ.शितल समाधान लोखंडे यांना एकुण 215 मते मिळाली तर आ.परिचारक गटाच्या सौ.सुजाता मोहन लोखंडे यांना एकुण 242 मते मिळाली. या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर आ. परिचारक गटाच्या सौ. सुजाता मोहन लोखंडे या एकुण 27 मतांनी विजयी झाल्या.
सौ. सुजाता मोहन लोखंडे यांच्या विजयामुळे आ. परिचारक गटात नवचैतन्याचे वातावरण संचारल्याचे आढळून आले. निकालानंतर विजयी उमेदवाराचे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांतराव परिचारक, प्रणव परिचारक यांनी अभिनंदन केले. शिरढोण ग्रामपंचायतीसमोर विजयी उमेदवार सौ. सुजाता मोहन लोखंडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करुन हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही निवडणुक जिंकण्यासाठी पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment