भवानी पेठ कचरा संकलन केंद्रात घाणीचे साम्राज्य
डम्पिंग करण्यासाठी रॅम्प उपलब्ध नाही व संकलन विभागाला कोणताही फलक नाही
सोलापूर (प्रतिनिधी)११- स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या भवानीपेठेतील कचरा संकलन केंद्रात सायंकाळच्या सुमारात घाणीचे साम्राज्य दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून भवानीपेठेत सूक्ष्म कचरा व्यवस्थापन, कचरा संकलन केंद्र, प्रभागातील घंटागाडी या सर्व समस्या नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाठपुरावा करत आहे. दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी भवानी पेठ कचरा संकलन केंद्रात पाहणी केली असता विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधिल सर्व कचरा गोळा करून RC गाडी मध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात आले आहे असे प्रथमदर्शनी कळले. घंटागाडी मधिल सर्व कचरा RC मध्ये भरून तुळजापूर रोड जवळील कचरा डेपो मध्ये टाकला जातो. परंतु घंटागाडीतून मोठ्या गाडीत भरण्यासाठी कोणत्याची प्रकारची रॅम्प नसल्याचे उघड झाले. पालिकेच्या घंटागाड्यांचे थेट मोठ्या वाहनात कचरा भरताना घंटागाडी मागील भाग पूर्णतः खराब झाला आहे. रॅम्पची उपलब्धता नसल्याने पालिका घंटागाड्यांचे लाखो रुपये नुकसान होत आहे.
लाखो रुपयांचा मालमत्ता असलेल्या मेन गेटवर सिक्युरिटी गार्ड नसल्याचे ही निदर्शनास आले आहे. झोन मधिल कचरा भरताना बाहेर पडलेल्या कचऱ्याची स्वच्छता झालेली नव्हती. यामुळे भवानी पेठेत डेंगूचे डास वाढण्याचे नाकारता येणार नाही. झाडेझुडपे वाढलेल्या स्थितीत असताना कर्मचारी प्लास्टिक व पुठ्ठा जमा करण्यात व्यस्थ असतात. महापालिकेने सदर भवानी पेठेतील जागा भाडेतत्त्वावर दिले आहे की कोणत्या पालिका सदस्यांची हलमिळवणी झाली ? एकीकडे महापालिकेकडे सोलापूरातील जागेचे उत्पन्न कमी झाल्याचे तक्रारी वाढत असताना जुना विभागीय कार्यालयाची जागा कोणाच्या हस्तांतरणाने दिले ? महसूल पालिकेला मिळतो का ? कोणाला मलिदा पोहचते हे पाहणे गरजेचे आहे. या कचरा संकलन मार्गावर पलीकडे महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात व जवळच 500 मीटर अंतरावर भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्रातून 20 एमएलडी पाणीपुरवठा होत असताना या घाणीच्या साम्राज्यातून उद्भवणारे डोंगू च्या डासांमुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. रूपाभवानी मंदिरास मंगळवारी व शुक्रवारी हजारो भक्तगण दर्शनांसाठी जाताना या कचरा विभागातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. मंदिर परिसरात या कचरा विभागाला मान्यताच कोणी दिले याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.


No comments:
Post a Comment