सीएनएस सोलापुर मॅराथॉन मध्ये पोलिस होणार सहभागी
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती.
5 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सीएनएस सोलापूर मॅरेथॉन मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस सहभागी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेतून आपल्याला आपल्या शरीराला व्यायामाची सवय लागते त्यातून निरोगी शरीर होण्यास मदत होते म्हणूनच सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा तिसर्या वर्षीही चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार आहे. असे पोलिस अधीक्षक यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन वर्षांच्या यशस्वी आयोजना नंतर या वर्षी म्हणजे पाच जानेवारी 2020 रोजी सोलापूर मध्ये सीएनएस सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच वर्षी सोलापूर मॅरेथॉनला एम्स या जागतिक संघटनेचे मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचे निमंत्रण देण्याकरता गेल्यास व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रथम स्वतःचे नाव मॅरेथॉन साठी नोंदविले आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांनाही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले .
ही मॅरेथॉन स्पर्धा तीन गटात होणार आहे 21 किलोमीटर, दहा किलोमीटर, आणि साडेतीन किलोमीटर.
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 4 लाख 36 हजार रुपयांची बक्षिसेआहेत .यावेळी सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर ,डॉ. विक्रम दबडे, डॉ.सत्यजित वाघचवरे डॉ. किरण किणीकर उपस्थित होते.
सोलापूर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी www.solapurmarathon.com या वेबसाईटवर नाव नोंदण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2019 असून यात सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर रनर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment