बसपा च्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी रवी सर्वगोड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

बसपा च्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी रवी सर्वगोड






बसपा च्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी रवी सर्वगोड 

पंढरपूर ( प्रतिनिधी ) 
बहुजन समाज पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पंढरपूरात संपन्न झाली, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बसपाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीची समीक्षा यावेळी करण्यात आली, पार्टी चे बूथ स्तरावरचे कच्चे असलेले नेटवर्क, पक्के करण्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आले. भविष्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला पार्टी पुर्ण ताकदीनिशी समोर जाण्यासाठी आणि पार्टी चे संघटन मजबूत करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यकारणी गठीत करण्यात आली. बहुजन समाज पार्टी च्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी रवी सर्वगोड, विधानसभा प्रभारीपदी प्रेमचंद सावंत सर, विधानसभा महासचिव पदी येताळ खरबडे, पंढरपूर शहर अध्यक्ष पदी अॅड. सी.एस.बनसोडे इत्यादी प्रमुख पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रभारी बलभीम कांबळे, भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव दुपारगुडे,जिल्हा सचिव प्रेमनाथ सोनवणे, बामसेफचे एल.एस.सोनकांबळे बाबासाहेब शिंदे, श्रीकृष्ण प्रक्षाळे, दत्तात्रय वाडेकर, अमोल वाघमारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages