सनराईज गुरुकुलच्या मैदानावर माऊली शिक्षण संस्थेचा क्रीडा सप्ताह संपन्न
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराईज इंग्लिश मिडियम गुरुकुल,लक्ष्मी-आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज , प्रि-प्रायमरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १३/१२/२०१९ व १४/१२/२०१९ या कालावधीत संस्थेचा वार्षिक क्रीडा सप्ताह संपन्न झाला.
आज शनिवार दि-१४/१२/२०१९ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णात दादा बोबडे, टेंभुर्णी येथील प्रसिद्ध डॉ. चोपडे संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे सचिव सूरजा बोबडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन झाले.
या प्रसंगी सनराईज चे प्राचार्य सिद्धलिंगाप्पा प्रभाकर, लक्ष्मी-आनंद चे प्राचार्य वैभव माने, संस्थेचे कॉर्डिनेटर शंकर सोनटक्के व प्रि-प्रायमरी विभाग प्रमुख सुचित्रा बाकरे,पी टी ए मेंबर हेड सोनाली चोरडिया व संस्थेचा सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सनराईज गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मार्च पासिंग करून सर्वांची मने जिंकली,तसेच कॅप्टन राजकुमार नांगरे यांनी सर्वांच्या वतीने क्रीडा शपथ घेतली.
याप्रसंगी संस्थेच्या लक्ष्मी-आनंद व सनराईज गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून नृत्याविष्कार सादर करून सर्वांची मने जिंकली त्यामध्ये सनराईज गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आयपीएल व सादर करून सर्वांना आश्चर्य चकित केले. लक्ष्मी-आनंद च्या विद्यार्थ्यांनी हर मैदान पर फते गीत व पिरॅमिड या प्रकारावर नृत्याविष्कार सादर केला.
या प्रसंगी सोलापूरच्या दैनिक पत्रकार उपस्थित होते.
दि-१३/१२/२०१९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये प्रि-प्रायमरी सह १ली ते ४थी हा एक गट ५वी ते १०वी व ११वी ते १२वी अशा गटांने खेळवलल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलिबॉल,लांब-उडी, रिले, धावणे इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
आपल्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर चोपडे यांनी आरोग्याची गुरुकिल्ली आणि खेळ यांचा सहसंबंध स्पष्ट करून सुसंस्कृत विद्यार्थी घडण्यात शिक्षणाबरोबर क्रीडा विभागाचा मोलाचा हात आहे असे म्हटले.
या दोन्ही दिवशी खेळल्या गेलेल्या खेळांमध्ये खालील हाऊसने प्रावीण्य मिळवले.
सनराईज गुरुकुलच्या येल्लो- हाऊस ने प्रथम, ग्रीन-हाऊस ने द्वितीय तर ब्लू-हाऊस ने तृतीय क्रमांक मिळून स्कूलचे नाव उंचावले, तसेच लक्ष्मी आनंद विद्यामंदिरमध्ये ग्रीन-हाऊस प्रथम, रेड-हाऊस द्वितीय व ब्लू-हाऊस ने तृतीय क्रमांक मिळवला.
अशा पद्धतीने वरील सर्व हाऊसने आपापल्या हाऊसचे व स्कूलचे नाव उंचावले.
वरील सर्व क्रीडा प्रकार प्रकारांमध्ये क्रीडा विभाग प्रमुख विजय सरगर, कुंदन कदम , गणेश मिटकल, दिपक माने, अमोल कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील खेळ प्रकारासाठी संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे सचिव सुरजा बोबडे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment