नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 15, 2019

नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धाचे आयोजन



नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने
प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली  व
बेस्ट सॅन्टाक्लॉज  स्पर्धाचे आयोजन
 नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली  व बेस्ट सॅन्टाक्लॉज  स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे .या रॅलीतून  समाजात शांतता , सदभावना व पर्यावरण जनजागृतेचा संदेश देण्यात येणार आहे .तसेच "  नो डी. जे.  " चा संदेश देण्यात येणार आहे .  तसेच , बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे .प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखावा हा आपल्या चारचाकी वाहनातून सजावट करून आणून या रॅलीमध्ये स्पर्धकांनी सहभागी व्हायचे आहे . यंदाचे दुसरे वर्ष आहे .
  शनिवार २१डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५  वाजता सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून हि  रॅली सुरु होणार आहे . तसेच बेस्ट सॅन्टाक्लॉज  स्पर्धेमध्ये सर्व धर्मिय बांधव सहभागी होऊ शकतात . तसेच प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व चर्चला सहभागी होता येईल .  महात्मा गांधी रोडवर विविध शाळामंधील विद्यार्थी बँड पथक व जनजागृतीचे संदेश देणार आहे . वेगेगळ्या चर्चमधील तरुण तरुणी नाताळची गाणी गाणार आहेत .  यावेळी अनेक ग्रुप  येसू ख्रिस्त जन्माचे सामूहिक नृत्य सादर करणार आहेत . या बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धा   व प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी फोन - ०२० - ४८६०४८७१ , पीटर डिक्रूज मोबाइल - ८९२८७८५३०६ , केविन मॅनवेल मोबाइल - ९९२२११२४२४ व रिटा मारियान मोबाइल - ८९७५८९५१५८ शालोम ख्रिश्चन असोसिएशन , ए - ५५ , विरवानी प्लाझा , पहिला मजला , ईस्ट स्ट्रीट ,हॉटेल ईलेवन   स्ट्रीटजवळ , पुणे कॅम्प , पुणे 
या रॅलीचा मार्ग  एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून , सोलापूर रोड , फातिमानगर , विठ्ठलराव शिवरकर रोड ,जांभुळकर चौक , जगताप चौक , संविधान चौक , रहेजा गार्डन , गंगा सॅटेलाईट , नेताजी नगर , लुल्लानगर चौक , सी टी सी , गोळीबार मैदान चौक , ट्राय लक हॉटेल चौक , कोहिनुर चौक , महात्मा गांधी रोडमार्गे महावीर चौक , अरोरा टॉवर्स चौक ,  बुटी  स्ट्रीट , गवळी वाडा , मॅजेस्टिक हॉटेल , ख्राईस्ट चर्च मार्गे क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये रॅली समाप्त होईल .
रॅली समाप्तीनंतर क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली  व बेस्ट शांताक्लॉज  स्पर्धेचा पारितोषिक वितरण पुणे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे यांच्याहस्ते होईल . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages