राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त राज्य शासनाकडून बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन व्हावे : रविंद्र बेडकिहाळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 15, 2019

राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त राज्य शासनाकडून बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन व्हावे : रविंद्र बेडकिहाळ







राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त राज्य शासनाकडून 
बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन व्हावे :  रविंद्र बेडकिहाळ
फलटण : मंत्रालय व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांमधून 6 जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचेकडे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालय व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात शासन परिपत्रक क्रमांक जपूती 2218/प्रक्र/195/29, दि.26 डिसेंबर 2018 नुसार राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यानुसार वर्षभरात 37 कार्यक्रम आयोजित केले जातात.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रतिकुल ब्रिटीश राजवट असूनसुद्धा मुंबईतून 6 जानेवारी 1832 रोजी मराठी व इंग्रजी भाषेतील संयुक्त असे पहिले ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरु केले. राज्यातील सर्व पत्रकार, संपादक, मराठी भाषिक यांना याचा सार्थ अभिमान आहे. भारतीय लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम हा चौथा स्तंभ आहे व राज्य प्रशासनासाठी हा चौथा स्तंभ अतिशय जवळचा व महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेवून राज्यशासनातर्फे दरवर्षी 6 जानेवारी ‘राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन’ महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात व सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरा व्हावा. सदर दिवशी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना शासनाच्यावतीने सर्व कार्यालयातून अभिवादन करण्यात यावे अशी राज्यातील सर्व वृत्तपत्रे, संपादक, पत्रकार व प्रसारमाध्यमांच्या संघटनांच्या वतीने मागणी आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदरचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे नूतन प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे पाठविले आहे. त्यानुसार रविंद्र बेडकिहाळ यांनी विकास खारगे यांची समक्ष भेट घेवून सदर मागणीचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर खारगे यांनी सदरचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन यांचेकडे पाठवले आहे. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त अमर शेंडे, भारद्वाज बेडकिहाळ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages