महिला होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात
सिग्मा सामाजिक संस्था व लक्ष्य प्रतिष्ठान
यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न
महिला होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सिग्मा सामाजिक संस्था व लक्ष्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे संयोजन सिग्मा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ब्रायन स्वामी व लक्ष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेशदादा पुंडे यांनी केले होते
वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे . या कार्यक्रमामध्ये समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पहिली भारतीय महिला मुष्टीयोद्धा व राष्ट्रीय खेळाडू ऍड संध्या पानबुडे , कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मिस महाराष्ट्र २०१९ व प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री पायल बाविस्कर नगरसेविका कालिंदी पुंडे , शोभा ट्रस्टचे अध्यक्ष यास्मिन जुनेद , हुमानिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमेल रझा आदी मान्यवर उपस्थित होते .
यामध्ये महिलांचा फॅशन शो झाला . त्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात महिला रॅम्प वॉक केला . महिलांनी स्वसंरक्षण करण्याबाबतचे मार्गदर्शन केले

No comments:
Post a Comment