हक्काबाबत जागरुक रहा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 24, 2019

हक्काबाबत जागरुक रहा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे आवाहन

हक्काबाबत जागरुक रहा
अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे आवाहन







सोलापूर, दि 24 : ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सजग रहावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले. आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील  शिवछत्रपती रंगभवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या शोभना सागर, श्रीमती गुंड - पाटील, आंनद सागर, सदस्य श्रीमती मांडवे, राजेंरद्र घाडगे, अशेाक भांजे  उपस्थित होते.
A Turing point for Indian Consumers : The Consumer Protection Act- 2019  ही संकल्पना  निश्चीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. जाधव म्हणाले, सध्याचे जग ग्राहक केंद्रीत आहे. ग्राहकाच्या गरजा भागविण्यासाठी प्रत्येक उत्पादक आणि सेवा देणारी कंपनी उत्सुक असते. मात्र ग्राहकांनी आपले हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवावी.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उपस्थितांचे स्वागत समारंभ आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने  करण्यात आला. तसेच ग्राहक मेळावा, ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शन आणि व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते.
ग्राहकांच्या हक्कांची माहिती देणाऱ्या विविध स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक व आभार प्रताप सोनवणे यांनी मानले
या कार्यक्रमासाठी अनिल शहापुरे, सुयोग देशमुख, नितीन शिंदे , हेमंत फुलारी, अनिल चव्हाण, गणेश यावलकर यांनी संयोजन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages