महाडिक वस्ती शाळेमध्ये आनंद बाजारात 15 हजाराची उलाढाल
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- शालेय जीवनामध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानाची माहिती मिळावी म्हणून टेंभुर्णी येथील महाडिक वस्ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये  दि.२१डिसेंबर रोजी  बाल आनंद बाजार भरवला त्यामध्ये 15 हजारांची  आर्थिक उलाढाल तालूक्यात प्रथमच उलाढाल  झाल्याने  तालुक्यात या शाळेची चर्चा होत असुन विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचा अनुभव मिळाला.
 बाल आनंद बाजाराचे उदघाटन गोविंद आश्रम चे संस्थापक  दशरथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य औदुंबर देशमुख, पिंपळनेर चे केंद्रप्रमुख भाऊराव शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव कोल्हे ,उपाध्यक्षा मनीषा भरगंडे, सदस्य धनाजी  भरगंडे,  संतोष भरगंडे,   अनिल देवकर, पांडुरंग महाडीक, नवनाथ भरगंडे,  शिवाजी पाटील ,दत्तात्रय डोके, सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र ढगे, नंदकुमार काशिद, ज्योतीराम भरगंडे,  गोरख भरगंडे,  गणेश भरगंडे,  जयश्री देशमुख, सुनिता शिंदे ,शिक्षक शिरीष कुमार ढगे, मुख्याध्यापक संतोष वीर व गावातील पालक विद्यार्थी उपस्थित होते

 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments