तुषार (काका) कदम   सोशल फाउंडेशन तर्फे विविध सामाजिक  उपक्रमांचे  आयोजन !
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] - स्व . तुषार (काका) कदम यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पुस्तक भेट कार्यक्रम, मतिमंद शाळेस शैक्षणिक साहित्य भेट , वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन आणि भव्य रक्तदान शिबिर हे उपक्रम राबविण्यात आले. स्व . तुषार कदम यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी सापटने (टें )या गावातील विद्यालयात पुस्तकरूपी भेट हा कार्यक्रम साजरा  केला. यामध्ये विद्यालयास ३०००हजार रुपयांची अवांतर वाचनाची पुस्तके भेट दिली.या कार्यक्रमासाठी  सापटने( टें) गावचे युवानेते व माजि सरपंच      सागर   ढवळे -पाटील हे अध्यक्ष म्हणून तर गावचे सरपंच दत्तात्रय ढवळे- पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. वाचनाची संस्कृती वाढावी आणि स्व . तुषारचे अधिकारी व्हायचे स्वप्न मुलांनी पूर्ण करून सामाजिक योगदान द्यावे असे आवाहन सागर  ढवळे- पाटील यांनी केले.
केम ता. करमाळा येथील नागनाथ मतिमंद  विद्यालयास ६०००हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आण्णा ढवळे -पाटील तर प्रमुख पाहुणे  म्हणून अक्षय  ढवळे पाटील हे उपस्थित होते.तसेच स्व .तुषार काका कदम यांचा सर्व मित्रपरिवार उपस्थित होता.
सायंकाळी ४ वाजता टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या वक्तृत्व स्पर्धेत एकूण ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये चि. समाधान दत्तू मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला.त्यास ३००० रुपयांचे रोख पारितोषिक,ट्रॉफी  वैभव ढवळे पाटील यांच्या हस्ते आणि किशोर कदम सरपंच बेंबळे यांच्या वतीने भेट देण्यात आले.द्वितीय क्रमांक चि. सुरज विजय कुटे याने मिळवला त्यासाठी त्याला २०००हजार रुपयांचे रोख आणि ट्रॉफी हे पारितोषिक  अभय कोठारी यांच्या हस्ते भेट देण्यात आले तर तृतीय क्रमांक कु. आरती आबासाहेब मस्के हिने पटकावला यासाठी तिला १०००हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी  मा.नारायण भानवसे सर यांच्या हस्ते भेट देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ मध्ये प्रत्येकी १००रुपयांची एकूण ९पारितोषिके भेट देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे परीक्षण मा.नारायण भानवसे सर , हरिशचंद्र गाडेकर सर आणि  अनंत घळके सर यांनी केले तर सूत्रसंचालन गगन गोडसे सर आणि नानजी मस्के यांनी केले.दिनांक २२ डिसेंबर रोजी बेंबळे या गावी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत.जवळपास १००व्यक्तींनी यामध्ये रक्तदान केले.याचे संयोजन यशस्वी करण्यासाठी यशवंत कदम,नानजी मस्के, संदीप चव्हाण , उदय भोसले,नागनाथ भोजने, आण्णा कोळी, महावीर अनवते, जयकांत कदम, जय माने आणि तुषार काका मित्र परिवार यांनी कष्ट केले. तुषार (काका) कदम सोशल फाउंडेशन चे प्रेसिडें मा.भिमराव नवगिरे  सर यांनी कार्यक्रम यशस्वी करणारी सर्व मित्रमंडळी या सर्वांचे आभार मानले आणि ही सामाजिक संस्था भविष्यात सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम राबवले असे आश्वासन दिले.

 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments