मोहोळ तालुक्यातील विरवडे येथे हरणाच्या कातडीची चोरी.
मोहोळ - दि तालुका प्रतिनिधी मोहोळ तालुक्यातील विरवडे येथे गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार बानु भीमा पवार यांच्या वस्तीवर उपवन संरक्षण वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक धाड घातली असता तेथे हरणांचे कातडे सुकलेल्या मासं शिंगें व अन्य साहित्य मिळून आले वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बापू पवार त्याला अटक केली असून त्याला मोहोळ कोर्टासमोर उभे केले असता 27 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्याचा आदेश मोहोळच्या न्यायालयाने दिला याबाबत माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील विरवडे या गावातील विक्रम ज्ञानदेव जावळे यांच्या गट नंबर २५१या मध्ये उच्च दर्जाची वीज वाहिनी गेलेली आहे त्याच्या खाली बाबू पवार हे आपल्या कुटुंबासह राहत आहे वनसंरक्षण खाते सोलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी मोहोळ त्यांच्या गुप्त खबर यामार्फत माहिती मिळाली की बाबू पवार यांच्या शेतात काळवीट हरिण या वन्य प्राण्यांचे हत्या करून त्याचे कातडे व मास सुकलेल मासं येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून येथे अचानक धाड टाकली असता त्याठिकाणी हरणाचे कातडे त्याची सुकलेले मास त्यांची हाडे मोठ्या प्रमाणात मिळून आले त्याचबरोबर त्यांची शिकार करण्यासाठी नायलॉन दोरी चे फासे वाघर व इतर साहित्य मिळून आले त्या ठिकाणी बाबू पवार याला अटक करून मोहोळच्या न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली त्याचबरोबर कातडी मासं शिंगे हे याच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे चे विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments