माईर्स, एम. आई. टी विश्वशांति गुरुकुल निवासि स्कूल, पंढरपुर शाळेचे वार्षिक स्नेहसमेलन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 25, 2019

माईर्स, एम. आई. टी विश्वशांति गुरुकुल निवासि स्कूल, पंढरपुर शाळेचे वार्षिक स्नेहसमेलन संपन्न


माईर्स, एम. आई. टी विश्वशांति गुरुकुल निवासि स्कूल, पंढरपुर शाळेचे वार्षिक स्नेहसमेलन संपन्न









माईर्स, एम. आई. टी विश्वशांति गुरुकुल निवासि  स्कूल, पंढरपुर या संस्थेचे  ७ वे  वार्षिक स्नेहसंमेलन रविवार ,दिनांक २२ डिसेंबर २०१९ या दिवशी शाळेच्या  भव्य प्रांगणामधे संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून एम. पी. एस. सी. उत्तीर्ण आणि सध्या पि. एस.आई. म्हणून पुणे येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध  बासरी वादक   दादासाहेब खुळे व पंढरपुर मधील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ सौ. रुजुता उत्पात - गोलवलकर हे प्रमुख पहने म्हणून उपस्थित होते. तसेच  पंढरपुर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  माननीय  अच्चुत कराड हे देखील उपस्थित होते.  

माईर्स, एम. आई. टी विश्वशांति गुरुकुल निवासि  स्कूलमध्ये नेहमी प्रमाणे आपले वेगळेपण सिद्ध करत या ही वर्षी इंडियन  फेस्टिवल या शीर्षकाखाली वार्षिक स्नेहसमेलन आयोजित केले ज्या मधे नर्सरी  ते १० वी च्या एकूण ५१० विद्यार्थ्यांने आपल्या कला गुणाचा अविष्कार दाखवला. सुरवात प्रमुख पाहण्यांच्या स्वागताने झाली. शाळेचे प्राचार्य  शिवजी गवळी यानी  वार्षिक अहवाल सादर केला, उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमासाठी आलेल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामधून २००० लोकांनी आपली उपस्थिति दर्शविली. माईर्स, एम. आई. टी विश्वशांति गुरुकुल निवासि  स्कूल, पंढरपुर शैक्षणिक गुणवत्ते सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नेहमीच तत्पर असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असणारे उत्सव देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशाप्रकारे साजरे होतात व त्यांचे महत्व आयोजित केलेल्या नृत्य, स्किट  या माध्यमातून शाळेच्या  विद्यार्थांनी प्रदर्शित केलेे.

या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य  शिवजी गवळी , उपप्राचार्य  सचिन कुमार शर्मा, समन्वयक  नारायण जोशी . प्रियंका समुद्रे , एस्टेट मैनेजर  अल्ताफ शेख, प्रशासकीय अधिकारी  केदार भोकरे, संतोष गरजे , समीर आहेरसिंग,  योगेश मुळे ,  महेश मूलगे , श्री प्रवीण दराडे,  स्मिता काळे,  गौरी गोसावी यांनी विशेष मेहनत घेतली.  कार्यक्रमा साठी आलेल्या सर्व लोकांची भोजन व्यवस्था श्री नितिन हजारे ,  श्रीपाद बडवे आणि  गोरख अव्हाड यांनी केली, तसेच संस्थेचा सर्व शिक्षक वर्गाचा विशेष सहभाग लाभला, कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालक वर्गाने आणि विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष   डॉ. विश्वनाथ कराड आणि प्रोफेसर स्वाती चाटे यानी कार्यक्रमाच्या यशाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages