भाई जगन्नाथराव लिगाडे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सांगोला(प्रतिनिधी) : थोर सामाजिक कार्यकर्ते, बहुजनांचे कैवारी कै. भाई जगन्नाथराव लिगाडे यांच्या १४ व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील थोर सामाजिक कार्यकर्त्या,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान तसेच भव्य महिला मेळावा, आदर्श माता पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी बक्षीस वितरण समारंभ अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाई जगन्नाथराव लिगाडे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तथा चेअरमन नानासाहेब लिगाडे यांनी दिली.
माणदेशी माणूस घडविण्याचे काम भाई जगन्नाथराव लिगाडे ऊर्फ तात्या यांनी केले आहे, सामाजिक चळवळीतून समाज विकास करण्याचे ध्येय त्यांनी पुढील पिढीला दिली आहे, या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर व्हावा, या हेतूने रविवार दिनांक २९ डिसेंबर २०१९ दुपारी १ वाजता सरदार शामराव लिगाडे विद्यालय व ज्यू कॉलेज ऑफ सायन्स अकोला (वा) ता-सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे. माणदेशी जनसेवक भाई जगन्नाथराव लिगाडे उर्फ तात्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी अनाथांना व स्त्रियांना उजेडाच्या वारसदार बनविणाऱ्या, ७५० हून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या ,आणि ज्यांच्या जीवनावर मराठी चित्रपट निर्माण झाला, अशा थोर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले भूषविणार आहेत.या वेळी भाई जगन्नाथराव लिगाडे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त "भव्य महिला मेळावा,आणि भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या)"आदर्श माता पुरस्कार"व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी बक्षीस वितरण समारंभ होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यू कॉलेज चे प्राचार्य व्ही.के.पाटील आणि जगन्नाथ राव लिगाडे चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment