Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत गंमतजत्रा संपन्न.

                                     ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत गंमतजत्रा संपन्न. 







बालगीतांच्या ठेक्यावर थबकणारी पावले, आनंदाचे चित्कार अन हर्षोउल्हास. गुलाबी थंडीत गुलाबी पांढऱ्या विशेष गणवेशातील जणू टवटवीत गुलाबांच्या फुलांचे संमेलनच ज्ञान प्रबोधिनीच्या आवारात भरले होते ; सामाजिक जाणीव विकसन या हेतूने प्रशालेत समाजदर्शन हा उपक्रम घेतला आहे. बालविकास मंदिराच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिशु शिक्षण हा समाजदर्शन उपक्रमाचा मध्यवर्ती विषय होता. या उपक्रमाची सांगता शिशूंसाठी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गंमत जत्रेने झाली. कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परमेश्वर राऊत व अंगणवाडी सेविका प्रमुख ( सोलापूर शहर ) शीतल ढेपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बालविकास मंदिरचे संस्थपाक स्व. जनुभाऊ व स्व. अवंतिकाबाई केळकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून झाली. याप्रसंगी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा शारदाताई घानाते, स्वातीताई काटे व संस्थेतील सर्व विभाग प्रमुख उपस्तिथ होते. प्रशालेतील माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी शिशु व बालकांसाठी भाषा, गणित, विज्ञान, कारककौशल्य व गंमत खेळांची निमिर्ती केली. शिशु विभागातील विद्यार्थ्यांनी या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. उदघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना परमेश्वर राऊत सरांनी मुलांचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा समाजाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करून त्यांच्यात सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण होण्याचे करण्याचे कार्य शाळा करीत आहे. या बद्दल आनंद व्यक्त केला. उपक्रमातून शाळा केवळ विद्यार्थीच नव्हे तर भावी नागरिक घडवीत आहे असा विश्वास व्यक्त केलं. गंमतजत्रेत येणाऱ्या सर्व शिशुना बक्षिसे व खाऊ देण्यात आला. या आयोजनकरिता प्रशालेच्या मुखाध्यापीका सुनीताताई चकोत यांनी मार्गदर्शन केले. या समारंभास पालकशिक्षक संघाचे सदस्य, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.  
Reactions

Post a Comment

0 Comments