शिवणे येथे श्रमसंस्कार शिबिराला झाली सुरवात.
शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत शिवणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात.
सांगोला(जगन्नाथ साठे) शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व शिवणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवणे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दिनांक 24 डिसेंबर रोजी उदघाटन संपन्न झाले.
आज बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिरानिमित्त "जलसंधारण व कृषी क्षेत्रातील आव्हाने"या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्रा. डॉ.अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जलसंधारण आणि कृषी क्षेत्रात असणारे आव्हाने यासंदर्भात योग्य मार्गदर्शन केले. दिनांक 24 डिसेंबर 2019 ते सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी शिवणे ता- सांगोला येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात साठ प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला आहे.या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे. यावेळी अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून शेती करणेआज किती गरजेचे आहे, हे पटवून देताना कृषी क्षेत्रातील अडचणी समजावून सांगितल्या आणि त्यावर उपाय योजना काय करता येतील हे समजावून सांगितले. हे शिबीर संस्था अध्यक्ष बबनराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य विजयकुमार वाघमोडे आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने यशस्वी होत आहे. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य विजय वाघमोडे,प्रगतिशील बागायतदार बजरंग जानकर,धोंडीराम जानकर, रावसाहेब माळी, सुभाष पाटील, सरपंच मनिषा कांबळे, प्रकल्पाधिकारी विठ्ठल वलेकर,कार्यक्रमाधिकारी राजाभाऊ कोळवले,अरुणा पाटील मॅडम शोभनतारा मेटकरी मॅडम, हेमंत वाघमोडे,कार्यक्रमाधिकारी नवनाथ भोसले,खडतरे, इरकर तसेच अभिजीत मिसाळ दत्तात्रय माने, शेळके सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments