शारदेय गुरुकुल शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन
लक्ष्मणराव देशमुख गुरुजी बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल व श्री शारदेय गुरुकुल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या खेळाच्या सप्ताहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३.१२.२०१९ वार सोमवार प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कृषीतज्ञ आणि मार्गदर्शक श्री. गोरक्षनाथ भांगे आपला वेळात वेळ काढून उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आट्यापाट्या क्रीडापटू श्री. विजय अशोक बडगुजर हे आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर रॉक बाॅल महाराष्ट्राचे महासचिव, श्री. अक्षय विजय सोनवणे हे उपस्थित होते. तसेच सर्व पत्रकार बंधू व याचबरोबर प्रशालेच्या कार्यकारी संचालिका, सौ. प्रियंका हर्षवर्धन देशमुख याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट संचलन केले. संचलनानंतर ज्योत प्रज्वलन झाले आणि क्रीडाशिक्षकांपासून विद्यालयाच्या क्रीडा प्रतिनिधींनी मैदाना भोवती आकाश, पृथ्वी, वायू आणि अग्नी अशा गटांच्या माध्यमातून क्रीडा मैदानाची प्रदक्षिणा घालून ज्योत मंचावर स्थिर ठेवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सौ. प्रतिभा शिंदे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा, शाळेच्या कार्यपद्धतीचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मुद्दा आणि असे बरेच काही मुद्दे प्रास्ताविकामध्ये घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. गोरक्षनाथ भांगे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. भांगे सरांनी विद्यार्थ्यांच्या वाढीचा, त्यांच्या आहाराचा व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा मुद्दा विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून सांगितला. पालकांची विद्यार्थ्यांबाबत ची असणारी कर्तव्ये आणि त्यांच्या असणाऱ्या जबाबदार्या यांचीही आठवण त्यांनी करून दिली.
आपल्या संशोधनाबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या असणाऱ्या आहाराविषयी मोलाचे मार्गदर्शनही केले आणि विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याचा सल्लाही दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री. विजय अशोक बडगुजर यांनी आपल्या भाषणामध्ये आहार आणि जीवनात खेळाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तसेच नेहमी खेळत राहा, आनंदी राहा आणि हार पचवण्याचा व नंतर दुप्पट प्रयत्न करण्याचा सल्लाही दिला. यानंतर कार्यक्रमांमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर प्रात्यक्षिकेही केली. त्यामध्ये वाहतूक आणि हेल्मेटचा वापर या विषयांची प्रात्याक्षिके सर्वांच्या आकर्षणाची ठरली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन झाल्यानंतर विद्यालयातील मोठ्या मुलांची धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि क्लॅपर वाजवुन धावण्याच्या स्पर्धा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पुरुष पालक यांचाही एक धावण्याचा राऊंड घेण्यात आला. त्यामध्ये विशेषतः श्री दीनानाथ (बापू)काळे वय वर्षे 67 ज्येष्ठ पालक यांनी सहभाग घेतला व शर्यत पूर्ण केली. यामुळे सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्यात खुप उत्साह निर्माण झाला. विजेत्या पालकांचे अभिनंदन करून महिला पालकांची लंगडी हा खेळ घेण्यात आला. या प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने क्रीडा सप्ताहाची सुरुवात श्री. शारदेय गुरुकुल मध्ये झाली.
Attachments area

0 Comments