दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी
दि:-२४/१२/२०१९ वार मंगळवार रोजी दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी या दोन्ही शाळेत साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दत्त प्राथमिक चे मुख्याध्यापक सादिक बागवान तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन ठोंगे व प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत लोखंड सरउपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.साने गुरुजींच्या जीवनावर आधारित काही विध्यार्थ्यांना आपले विचार मांडले
मोहन ठोंगे सरांनी श्यामची आई या त्यांच्या पुस्तका विषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून सादिक बागवान सरांनी साने गुरुजी व मुलातील असलेली जवळीकता तर चंद्रकांत लोखंडे यांनी किती निरपेक्ष वृत्तीने साने गुरुजी वागत हे विचार मांडले
सदर कार्यक्रमास युवराज जगताप सर,सुनील लंगोटे सर, श्रीकांत कुंभारे सर, मंगेश मोरे सर, संगीता काळे मॅडम, अरुणा मठपती मॅडम, सचिन काळे , राहुल ठोंगे , संतोष ठोंबरे , विलंबिनी पाटील मॅडम व सेवक दत्ता ठोंगे,संदीप भोरे आदी उपस्थित होते.

0 Comments