नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने
प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली उत्साहात संपन्न
बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धेमध्ये विलियन स्वामी विजेता
नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली उत्साहात संपन्न झाली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धेमध्ये विलियन स्वामी विजेता ठरला . या रॅलीतून समाजात शांतता , सदभावना व पर्यावरण जनजागृतेचा संदेश देण्यात आला . .तसेच नो डी. जे. चा संदेश देण्यात आला . प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखावा हा आपल्या चारचाकी वाहनातून सजावट करून आणून या रॅलीमध्ये स्पर्धक सहभागी झाले होते .
भैरोबानाला येथील सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून या रॅली सुरुवात बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्याहस्ते करण्यात आला . तसेच बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धेमध्ये सर्व धर्मिय बांधव सहभागीझाले होते . तसेच प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील चर्च सहभागी झाले होते. शंकरशेठ रोडवरील मोलेदिना टेक्निकल हायस्कुल मधील विद्यार्थी बँड पथक व जनजागृतीचे संदेश देण्यात आला . वेगेगळ्या चर्चमधील तरुण तरुणी नाताळची गाणी गायली . या कार्यक्रमाचे आयोजन शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी, पीटर डिक्रूज , गणेश त्रावडन , विल्सन डॅनियल , येसुनंदन दोराईस्वामी , अमिलराज फ्रान्सिस , एडविन जेकब , फ्रान्सिस सांतामारिया , रिटा मरियान आदींनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी ज्युनियर अभिनेते अमिताभ बच्चन व नाना पाटेकर यांनी सहभागी होऊन मनोरंजन केले . तसेच मिकी माऊसने बालचमूंचे मनोरंजन केले .
या रॅलीचा मार्ग एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून , सोलापूर रोड , फातिमानगर , विठ्ठलराव शिवरकर रोड ,जांभुळकर चौक , जगताप चौक , संविधान चौक , रहेजा गार्डन , गंगा सॅटेलाईट , नेताजी नगर , लुल्लानगर चौक , सी टी सी , गोळीबार मैदान चौक , ट्राय लक हॉटेल चौक , कोहिनुर चौक , महात्मा गांधी रोडमार्गे महावीर चौक , अरोरा टॉवर्स चौक , बुटी स्ट्रीट , गवळी वाडा , मॅजेस्टिक हॉटेल , ख्राईस्ट चर्च मार्गे क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये रॅली समाप्त झाली .
रॅली समाप्तीनंतर क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट शांताक्लॉज स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाला. यावेळी पुणे धर्मप्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डाबरे यांच्याहस्ते करण्यात आला . यावेळी शिवसेना नेते अजय भोसले , मेघराज पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते .


0 Comments