Hot Posts

6/recent/ticker-posts

आंबेडकरी विचारवंत बी.आर.भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

आंबेडकरी विचारवंत बी.आर.भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान



पंढरपूर-
अहमदनगरमधील नेवासी तालुक्यातील दीनमित्र मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार पंढरपूर येथील आंबेडकरी विचाराचे सामाजिक कार्यकर्ते बी.आर.भोसले यांच्या वैचारिक लेखांचे ""पेनाच्या टोकावर'' या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार नुकसान अहमदनगर येथे श्री.बाबा भांड साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष व औरंगाबाद येथील विद्यापीठाचे मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
बी.आर.भोसले हे पंढरपूर येथील आंबेडकरी विचारवंत म्हणून सर्वश्रुत आहेत. ते सातत्याने ज्वलंत प्रश्नावर लेख लिहित असतात. अनेक पाक्षिक, साप्ताहिक, दैनिकामधून त्यांचे लिखाण प्रसिध्द झालेले आहे. लिखानातील सातत्य व चिंतनशिल वृत्ती हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन थिंक टॅंक सोलापूर यांनी केले आहे.
""पेनाच्या टोकावर'' या ग्रंथास पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रसिध्द साहित्यिक योगीराज वाघमारे, बा.ना.धांडोरे, आर.पी.कांबळे, एम.जी.चंदनशिवे, डॉ.सारीपुत्र तुपेरे, डॉ.वामनराव जाधव, गौतम सरतापे, थिंक टॅंकचे बाळासाहेब मागाडे,  श्रीकांत कसबे, सुनिल वाघमारे यांच्यासह चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे.
Attachments area

Reactions

Post a Comment

0 Comments