एम. बी. चव्हाण इंग्लिश मेडीयम स्कूल कामाती खुर्द मध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 17, 2019

एम. बी. चव्हाण इंग्लिश मेडीयम स्कूल कामाती खुर्द मध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन



एम. बी. चव्हाण इंग्लिश मेडीयम स्कूल कामाती खुर्द  मध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन
एम बी चव्हाण इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन  करण्यात आले . या वेळी या कार्यक्रम साठी  संस्थेचे  अध्यक्ष भीमराव चव्हाण साहेब, सचिव गणेश चव्हाण  उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमा साठी  प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रशांत बिराजदार व शहाजहान शेख हे उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक  श्री धनाजी राठोड कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून  उपस्थित होते. या वेळी सर्व  मुले वा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक सर्वांनी मिळून क्रीडा विषयी प्रतिज्ञा म्हणाली .  विद्यची देवता मानले जाणारी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व  प्रतिमेसमोर वंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी सर्वांनी  खेळाविषयी आदर करत विविध  स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले. या मध्ये विद्यार्थी ,शिक्षक,इतर सर्वांनी  या मध्ये मोट्या प्रमाणात सहभागी झाले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल माने यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. प्रशांत बिराजदार यांनी मुलांना मोलाचे मार्मिक असे मार्गदर्शन केले. यांनी मुलांना खेळाचे महत्व पटवून दिले.  आत्ताच्या धकाधक्कीच्या  जीवनात खेळ किती महत्वाचे  आहे हे त्यांनी पटवून दिले.  त्यांनी अभ्यास क्रमाबरोबर खेळ किती उपयोगी आहे हे हि सांगितले. नोकरी मध्ये ही खेळाडू साठी विशेष आरक्षण आहे. त्यांनी खूप छान असे मार्गदर्शन मुलांना केले. तसेच मुख्याध्यापक यांनी ही खूप छान असे मार्गदर्शन  केले.  त्याच बरोबर आभाराचे काम अरविंद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  दिगंबर लोखंडे,एकनाथ  भांडकुबे,  प्रियांका गुंड, रोहिणी कदम, प्राजक्ता रणदिवे, अर्चना मसरे, नयना पवार, कविता राठोड, प्रियांका वसेकर, मोनिका माने, शुभांगी माने, अश्विनी राठोड, सारिका मावशी, संगीता गवळी, सर्व वाहन चालक, अमोल सोनवणे, फुटाणे, पिंटू,  रवी पवार,  सलगर, टेळे, पालक मोठया प्रमाणात  उपस्थित  होते.  या निमित्ताने विविध  स्पर्धा चे  आयोजन  करण्यात आले यात मोट्या प्रमाणात पालकांनी ही सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages