बार्शीत उस्मानाबाद जनता बँकेच्या शाखेतुन ६८ लाख रुपयांची चोरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 17, 2019

बार्शीत उस्मानाबाद जनता बँकेच्या शाखेतुन ६८ लाख रुपयांची चोरी


बार्शीत उस्मानाबाद जनता बँकेच्या शाखेतुन ६८ लाख रुपयांची चोरी


शनिवार किंवा रविवारी चोरी झाल्याचे सोमवारी उघडकीस


 बार्शी प्रतिनिधी -


बार्शीत उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बार्शी शाखेतून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी  तब्बल ६८ लाख ४३ हजार८०० रुपये चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत शाखाधिकारी  शशिकांत देशमुख यांनी फिर्याद दिली आहे .
अधिक माहिती अशी की बार्शीतील सोमवार पेठ घोडे गल्ली येथील उस्मानाबाद जनता बँकेचे शनिवारी दुपारी कामकाज झाल्यानंतर तिजोरी बंद करून चावी उपविधी प्रमाणे  कर्तव्यावर असलेल्या विश्वभर परीट या शिपायाकडे सोपवून सर्वजण बाहेर पडले रविवारी सुट्टी होती आज सोमवारी  सकाळी चावी जागेवर नसल्याचे  शिपाई शिंदे यांनी फोन करून सांगितले तर अकाऊंट बी. के. कांबळे यांच्या कपाटात अर्धवट तुटलेली चावी दिसली म्हणून संशय आला त्यामुळे बँकेतील मास्टर चावीने तिजोरी उघडून बघितले असता तिजोरीतून वरील रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.
सदर बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सदर कॅमेऱ्यातील दोन दिवसाचे फुटेज आणि इतर गोष्टी ची कसून चौकशी सुरु आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages