जे.डी.एम. स्कूलने पालकांमध्ये निर्माण केला नव्या युगाचा उत्साह : प्रा. गंगाधर बनबरे
प्रतिनिधी/ सोलापूर, दि. १५ : नव्या युगातील नवे तंत्रज्ञान मुलांना अवगत करावयाचे असेल तर पालकांनी ही नवनविन बदल स्विकारुन विज्ञाननिष्ठ बनले पाहीजे. शिवाजी राजे आपल्या घरात जन्मावे असे वाटत असेल तर अगोदर आईने जिजाऊ व वडिलांनी शहाजी बनले पाहिजे. आपला पाल्य जगाचा स्पर्धेत टीकवायचा असेल तर आपणही घरातील वातावरण हसत-खेळत ठेऊन मुलांना प्रेरणा दिली पाहीजे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. गंगाधर बनबरे यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण व क्रिडा मंडळ संचलित जे.डी.एम. स्कूल, शाहु महाराज प्राथ., माध्य. स्कुल व विजयसिंह मोहीते-पाटील कनिष्ठ महाविद्यालय या सर्व विभागातील विदयार्थी - पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी इतिहास संशोधक प्रा. गंगाधर बनबरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक गणेश निळ होते.
आपले पाल्य जगाच्या स्पर्धेत उतरावे असे वाटत असेल तर मुलांना वाट्टेल ते करु द्यात, त्यातूनच नवनिर्मिती होत असते. आपण त्यांचा बुद्धिला चालना दिली पाहीजे. मुल चंद्रावर गेली पाहीजेत,असे वाटत असल तर पालक म्हणून आपली ही भुमिका खुप महत्वाची आहे. ती भूमिका पार पाडता आली पाहिजे. जे.डी.एम. स्कूलने पालकांमध्ये नव्या युगाचा उत्साह निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रा. बनबरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संभाजी घाडगे, प्रा. संजय जाधव, शरद पवार, संस्थेच्या विश्वस्त सुषमा निळ, संचालक योगेश निळ यांची प्रमुख अथिती म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक पालक उपस्थित होते. या मेळाव्यात पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राध्यापक बनबरे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्या अश्विनी कवडे यांनी केले, तर अमोल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी निळ, सुवर्णा माने, ज्योती स्वामी, राखी ढोपरे, पुनम कापसे, वैभव मसलकर, रवि कोतकुंडे, प्रविण कोंढारे यांनी परिश्रम घेतले


No comments:
Post a Comment