महाराष्ट्र गवळी समाज पुणे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2019

महाराष्ट्र गवळी समाज पुणे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी नियुक्ती

महाराष्ट्र गवळी समाज पुणे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी नियुक्ती


                महाराष्ट्र गवळी समाज पुणे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी नियुक्ती बाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. हिरामणआप्पा गवळी यांच्या  अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोकराव भाले, मुख्य संघटक शंकरराव माटे, कोषाध्यक्ष बळीरामदादा महाडिक यांच्या प्रमूख उपस्थीतीत पुणे येथील विरशैव लिंगायत गवळी समाजाची बैठक संपन्न झाली . या बैठकीस   नारायणराव बहिरवाडे व भगवानभाऊ गवळी आदी मान्यवर उपस्थित होते .
                             यावेळी  पुणे जिल्हा गवळी समाज संघटनेची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली . यामध्ये  पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जूनराव जानगवळी, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष वसंत अहीर , पुणे शहर अध्यक्ष दिनेश रामचंद्र नायकू , पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष गणेश लंगोटे , पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष सागर अशोक बहिरवाडे , पुणे जिल्हा युवक अध्यक्ष धिरज रामचंद्र पंगूडवाले , पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रशांत अंकूश पहिलवान,पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष संजय दहिहंडे तसेच पुणे जिल्ह्यामधून प्रदेश कार्यकारणीवर प्रतिनीधी म्हणून ज्येष्ठ नेते व गेल्या २५ वर्षापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनीधीत्व करत असलेले नगरसेवक श्री. नारायणराव सदाशिव बहिरवाडे यांची सर्वानूमते नियूक्ती करण्यात आली.
               सर्व नवनिवार्चीत पदाधिका-यांच्या नियूक्तीची व कार्यकाळ ३ वर्षासाठी असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्षांनी जाहिर केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages