स्मार्ट सोलापूर तीव्र पाणीटंचाईमुळे हैराण... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2019

स्मार्ट सोलापूर तीव्र पाणीटंचाईमुळे हैराण...

स्मार्ट सोलापूर तीव्र पाणीटंचाईमुळे हैराण...
                                         [दादासाहेब नीळ 9604256207 ]


        स्मार्ट  सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापूर शहराची अवस्था 'आई जेवू घालीन, अन बाप भीक मागू देईना' अशीच झाली आहे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा तोंडावर आली असली तरी प्रशासन आणि मंदिर समितीमध्ये जमन्वयातून एकही प्रश्न मार्गी लागत नसल्याने यात्रा समिती शांत बसली आहे कि काय? असा प्रश्न विचारला जातोय. सध्या मंदिराच्या परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्यामुळे गड्डा यात्रा कुठे भरवायची हा प्रश्न आहे. खड्डे आणि धुळीमुळे श्वसनाचे आजार होऊ लागल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिक्रमणाच्या विळख्याने शहराला विळखा घातल्याचे दिसत आहे. दहा लाखांवर लोकसंख्या असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला आजवर अनेकवेळ लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या परंतु भागातील विविध समस्या सोडविणारे लोकप्रतिनिधी कालबाह्य झाल्यामुळे गट-तट, तू-तू, मैं-मैं मुळे शहराचा विकास होऊ शकलेला नाही. विरोधी पक्षात असताना आम्हाला सत्ता द्या आम्ही हैव करू, आम्ही तैव करू असे सारेच करतात. परंतु प्रत्यक्षात विकास झिरो होतो. 11 महिन्या 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. हा राज्याचा लोकशाहीचा अपमान असल्याचे बोलले जात आहे.
                              भौगोलिकदृष्ट्या सोलापूर जिल्हा महत्वाचा असल्याने या जिल्याच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात वाढ होणं गरजेचं आहे. विकासकामांमध्ये राजकारण आणणारे नेतेमंडळी देशहितापेक्षा स्वहिताला जास्त जपू लागले. त्यामुळेच शहरातील नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशेला भटकंती कापावी लागत आहे. पाणी ,वीज, रस्ते या तीन समस्यांना घेराव घातल्याशिवाय नवा राजकारणी पेहराव घालत नाही. मोठमोठ्या गप्पा मारून शहराला मॉडेल बनवू अशा घोषणा केल्या जातात. परंतु घोषणा हवेत विरून जातात. शहराची मूळ समस्या पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी सोरेगावदरम्यान जलवाहिनीला दहा ठिकाणी गाळणी झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. पाण्याचे राजकारण करून स्टंटबाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांना हा विषय तापवून देण्याची सवय जडली आहे. नुसता गोंधळ घालून एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही. पक्षात आणि मीडियामध्ये प्रतिष्ठा मिळावी या हेतूने सध्या सवयं प्रसिद्धीसाठीच काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या वाढत आहे. उजनी-सोलापूर, टाकळी-सोलापूर, हिप्परगा तलाव आदी जलवाहिन्या नेहमी फुटतात---कर्मचारी उठतात---दुरुस्ती करेपर्यंत विषय पेटतात---दुरुस्तीनंतर मिटतात. करोडो रुपयाचा निधी प्राप्त झालेल्या सोलापूर महापालिकेला पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्यामुळेच शहराला सध्या चार दिवसाआड पाणी मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी प्रामाणिकपणे काम करत नसल्यामुळेच शहराची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. टाकळी ते सोरेगाव मुख्य जलवाहिनीला वाडकबाल येथील जिल्हा परिषद शाळेजवळ, नांदणी चेकपोस्ट, डॉ सूरळे हॉस्पिटलच्या मागील बाजूला टाकळी पंपहाऊस  ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला व्हनमुर्गी फाटा आणि हॉटेल बसवेश्वर समोर नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईन असे विचार व्हायरल होत असूनही त्यामुळे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तात्पुरती मलमपट्टी करणारे अधिकारी शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून पाण्यासाठी शाळकरी मुले जीव धोक्यात घालून पाणी आणत आहेत. परंतु काम न करता पगार उचलणाऱ्या या अधिकाऱ्यांना शहरातील समस्यांची कसलीच काळजी नसल्याचे एकंदरीत दिसून आल्याने सोलापूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पाण्याच्या समस्ये विषयी आपले प्रखर  मत महताब शेख यांनी मांडले .
                   प्रत्येक महिन्याला गळतीचा कार्यक्रम सुरु आहे. दुरुस्तीसाठी तीन-तीन दिवस लागत असल्याने त्याचा विपरीत परिणाम पाणीपुरवण्यावर होत असल्याने शहरातील नागरिक जागे होणे गरजेचे आहे. दुरुस्तीच्या नावाखाली पाणीटंचाईचे संकट निर्माण केलं जात आहे. दररोज कुठेना कुठे तरी पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिरा केला जातो. नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करा असे आव्हान करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारांच्या अन कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जलवाहिनीतून रोज हजारो लिटर पाणी वाया होतो. याला कोण जबाबदार ? अधिकृत नळजोडणी आणि जळगळतीमुळे शहराला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages