वेतनासाठी अनुदानाची तरतुद करा;संयुक्त कृती समितीची शिक्षण संचालकांकडे मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2019

वेतनासाठी अनुदानाची तरतुद करा;संयुक्त कृती समितीची शिक्षण संचालकांकडे मागणी

वेतनासाठी अनुदानाची तरतुद करा;संयुक्त कृती समितीची  शिक्षण संचालकांकडे  मागणी

सोलापुर जिल्ह्यातील सरसकट २०% अनुदानप्राप्त शाळेतील शिक्षकांचे नियमित वेतन वेतन अनुदानाअभावी प्रलंबित आहे.वेतनासाठी अनुदानाची तरतुद तातडीने करा.अशी मागणी शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
                      जिल्ह्यातील २१ शाळा १९ सप्टेंबर २०१६ च्या शासननिर्णयानुसार सरसकट २०% अनुदानस पात्र ठरल्या.माहे सप्टेंबर २०१९ पासुन जवळपास १०० शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले नाही.वेतनासाठी अनुदान उपलब्ध नसल्याने वेतन अदा करण्यात आले नाही.मागील  ८ ते १० वर्षापासुन शिक्षक विनावेतन काम करत आहेत.या तुकड्यावरील शिक्षक १००% अनुदानास पात्र असताना तात्कालीन शिक्षणमंत्र्यांनी सर्वांना सरसकट २०% अनूदान जाहिर केले.मागील तीन वर्षापासुन वाढीव टप्पा मिळण्याऐवजी अद्याप २०% अनूदानावरच समाधान मानावे लागत आहे.वाढीव टप्पा अनुदान मिळण्याएवजी नियमित वेतन वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मागील चार महिन्यापासुन वेतन होत नसल्याने शिक्षकांना आर्थिक मेटाकुटीला आले आहेत.त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
                                     या शिक्षकांच्या वेतनासाठी तातडीने अनुदानाची तरतुद करावी.अशी मागणी डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषद व महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्यावतीने प्राथमिक शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे, शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर,सोमैश्वर याबाजी व अ.गफुर अरब  यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages