संगमेश्वर कॉलेजमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

संगमेश्वर कॉलेजमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन

विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो
                               कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस

संगमेश्वर कॉलेजमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन

 




सोलापूर (दिनांक२०)
 "शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील वैविध्यपूर्ण विज्ञान प्रकल्पातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो. संशोधनाची  दृष्टी मिळते, त्यातून विद्यार्थी आपापल्या विभागातील संशोधन निष्ठेने आणि आवडीने करतो. कठोर परिश्रम घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन ग्रामीण विकासाचे अनेक मॉडेल शेतकऱ्यांची मुले करत आहेत. नक्कीच मुले याचा वापर आपल्या प्रत्यक्ष शेती उद्योगात करतील असा विश्वास वाटतो.'' असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी केलं.ते संगमेश्वर कॉलेज च्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते संगमेश्वर कॉलेज च्या आवारातील संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या इमारतीत हे दोन दिवसीय प्रदर्शन भरले आहे. यामध्ये विविध महाविद्यालयातील 145 प्रकल्पांचा समावेश आहे. याप्रसंगी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, सोलापूर विज्ञान केंद्राचे राहुल दास , उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण निरीक्षक मिलिंद मोरे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, भूगर्भ तज्ञ डॉक्टर पी. टी. सावंत,कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य, उपप्राचार्य आनंद हुली आदी, पर्यवेक्षक प्रसाद कुंटेआदी  मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू फडणवीस पुढे म्हणाले की,'' शालेय स्तरावर मूलभूत विज्ञानातून मुले घडतात मात्र कनिष्ठ महाविद्यालयीन विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आपापल्या शाखेतून  मिळालेल्या ज्ञानाचा शाखेतील वापर प्रत्यक्ष कृतीत करताना दिसत आहेत. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे सेंद्रिय शेतीचे प्रयोग. अपार्टमेंट शेती. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांबरोबर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील विद्यार्थी त्याच्या ज्ञानाचा वापर करून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे व्यासपीठ गाजवत आहेत.या गटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थी देशासमोर आणत आहेत.''
उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण निरीक्षक मिलिंद मोरे म्हणाले की , ''विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयातून समस्या सोडवण्यासाठी मूलभूत उपाय सुचवले आहेत नाविन्यपूर्ण प्रयोग अतिशय कष्टाने रेखीवपणे मांडले आहेत त्याचा नक्कीच फायदा त्यांच्या पुढील आयुष्यात होईल .संशोधन प्रकल्पातून असे शेतकरीसंशोधक तयार होतील.असा विश्वास वाटतो. महाविद्यालयीन स्तरावरील असे उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शनीय ठरतात.'' असे सांगत आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली.सोलापूर सायन्स सेंटरचे राहुल दास यांनी प्रयोगाचे पाहणी करत विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचे आणि  सादरीकरणाचे कौतुक केले.
     विज्ञान हे विश्वकल्याणासाठी हे ब्रीद घेऊन कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग, विज्ञानातील नवोपक्रम, पारंपारिक ऊर्जा स्रोतांवर आधारित प्रकल्प , इलेक्ट्रोनिक अँड  कम्युनिकेशन या विभागातील प्रकल्पांचा समावेश यामध्ये आहे  .विज्ञान प्रकल्प यशस्वीतेसाठी विज्ञान विभागातील  प्रमोद उडगीकर,समन्वयक एम. आर. वाली, आर. एफ. डोंगरे, सुभाष पाटील ,आर. एस. कट्टी ,बी. पी. रणे यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी मंडळी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages