राष्ट्रीय लोकअदालतीत 77 प्रकरणे निकाली .16 कोटी 65 लाख रुपयांवर तडजोड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 15, 2019

राष्ट्रीय लोकअदालतीत 77 प्रकरणे निकाली .16 कोटी 65 लाख रुपयांवर तडजोड

   







  राष्ट्रीय लोकअदालतीत 77 प्रकरणे निकाली 
                   16 कोटी 65 लाख रुपयांवर तडजोड

            पंढरपूर, दि-14-  राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात दावे यांचे प्रलंबीत 573 प्रकरणे तसेच दाखल पुर्व 1196 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 77 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणामध्ये एकूण 16 कोटी 65 लाख दोन हजार 438 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती  जिल्हा न्यायाधीश -2 श्रीमती के.व्ही.बोरा यांनी दिली.
जिल्हा न्यायाधीश -2 श्रीमती के.व्ही.बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 14 डिोंबर 2019 रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या  लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनल मध्ये जिल्हा न्यायाधीश वर्ग-2 श्रीमती के.व्ही.बोरा, सह. दिवाणी न्यायाधिश श्रीमती ए.एस.नलगे, सह.दिवाणी न्यायाधीश एस.एस.खरोसे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.
यावेळी  विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages