कळंब आगारात वाहक- चालक यांच्यावर ढेकणांचा हल्ला , प्रशासन जोमात कर्मचारी मात्र कोमात! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 15, 2019

कळंब आगारात वाहक- चालक यांच्यावर ढेकणांचा हल्ला , प्रशासन जोमात कर्मचारी मात्र कोमात!






कळंब आगारात वाहक- चालक यांच्यावर ढेकणांचा हल्ला ,
प्रशासन जोमात कर्मचारी मात्र कोमात!
कळंब / येथील आगारात वाहक चालक यांच्या विश्रांती कक्षाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या विश्रांती कक्षाची दोन-दोन महिने सुद्धा स्वच्छता मोहीम होत नाही यामुळे या कक्षात ढेकुन, ढास अशा अनेक उपद्रवी कीटकांचा सामना या वाहक  चालकांना करावा लागत आहे वाहक- चालक दिवसभर ड्युटी करून रात्र काढण्यासाठी कसेबसे विश्रांती कक्षात आडवे होतात ना होतात तोच ढेकुण आणि डासांचा हल्ला त्यांच्यावर होतो त्यामुळे त्यांची चांगली झोप मोड होत आहे याकडे प्रशासन मात्र गांभीर्याने कधीच पाहत नाही अशा या कळबं च्या विश्रांती अक्षात ढेकुन डास अशा उपद्रवी कीटकांमुळे  चालक वाहक व कर्मचारी हे पुरतेच हैरान झाले आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी वाहक-चालक आतून होत आहे या विश्रांती कक्षामध्ये केवळ एकच लाईट कधीमधी चालणारा फॅन काचा नसलेल्या खिडक्या अशी अवस्था या विश्रांती कक्षाची झालेली आहे प्रशासनाचे कार्यालय म्हणजे एक आलिशान महाल आहे यामध्ये सर्व सोय उपयुक्त असं कार्यालय असून यात स्टाईल फरशी चांगले फॅन चांगला प्रकाश स्वच्छता आदी बाबी ने नटलेलं हे कार्यालय अधिकाऱ्यांचे आहे परंतु अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ दहा ते पंधरा मिनिटे विश्रांती कक्षात जावं म्हटलं तर त्याठिकाणी अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागत आहे यातच त्यांना लागणारे स्वच्छता ग्रह याची तर फार दुर्दशा झाली आहे अनेक वेळा प्रशासनाला वाहक चालकाच्या संघटनेने पत्र देऊन सुद्धा याकडे कानाडोळा केला जात आहे अशा या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वाहक चालक व इतर कर्मचारी चांगलेच हैराण झाले आहेत या सर्व बाबीकडे विभाग नियंत्रक यांनी जातीने लक्ष घालून सर्व सोय वाहक चालकांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी वाहक-चालक यांच्या  जोर धरत आहे .
चौकट
याबाबत चालक श्री शाहू माचवे यांनी असे सांगितले की आमच्या विश्रांती कक्षाची महिन्यातून एकदा अगर दोनदा झाडलोट होते त्यामुळे विश्रांती कक्षामध्ये सर्वात जास्त ढेकुन आणि डासांची संख्या जास्त झाली असून आम्हाला विश्रांतीसाठी समोरील असलेल्या दत्त मंदिराचा सहारा घ्यावा लागत आहे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आंदोलन करू असा इशारा चालक शाहू माचवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला
चौकट
याबाबत प्रभारी आगारप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी सध्या काही कारणास्तव सुट्टीवर आहे सुट्टीवर जाण्यापूर्वी मी  सर्व स्वच्छता करून घेतली होती सुट्टी घेऊन आल्यानंतरही मी स्वतः उभा राहून या विश्रांती कक्षाची स्वच्छता चांगली करून घेतो कारण वाहक-चालक हा आमच्या आगाराचा महत्त्वाचा काना आहे कारण ते जर आजारी पडले तर आगारा मोठे नुकसान होते त्यामुळे त्यांना आम्ही केंद्रबिंदू मानून प्रशासनाच्या सर्व सुविधा त्यांना तातडीने उपलब्ध करून देणार आहोत असे प्रभारी आगारप्रमुख सुरेंद्र  हौसलमल यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages