केंद्र सरकारच्या एनआरसी/ सीएए 2019 घटनाबाह्य निर्णयाच्या निषेधार्थ, सर्वसमाजवेशक आंदोलन
कुर्डुवाडी { प्रतिनिधी } केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपने संसदेमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयक अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. हे एन.आर.सी.व सी.ए.ए.२०१९ या विधेयकातील तरतूदी ह्या घटनाबाह्य असल्याने, केंद्र सरकारने केलेल्या कृत्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्षता या तत्वाला तिलांजली देण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ कुर्डूवाडी मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व धर्मियांनी जमा होऊन या घटनेचा निषेध करीत संविधान विरोधी कृत्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.यानंतर सदर निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी कार्यालयातील क्लार्क प्रदीप बांगर यांना देण्यात आली
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सर्व बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी सर्वधर्मीय बांधवांनी आपापल्या हातामध्ये देशाचा तिरंगा ध्वज फडकावत देश बचाव संविधान बचाव चा नारा दिला प्रत्येक नागरिकाच्या शर्टला काळ्या रिबिनी लावून सरकारच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. कुर्डूवाडी तील सर्व नागरिकांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन केले.
कुर्डूवाडी शहरातील सर्व बहुजनांना उद्देशून भारताचे संविधान हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा श्वास आहे आणि तोच श्वास दाबण्याचा तसेच संविधानामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे म्हणून या सरकारला खाली खेचण्याची काळाची गरज आहे.अश्या शब्दात अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.याप्रसंगी मुफ्ती मौलाना इब्राहिम कासमी जमाते हिंद सदर सोलापूर, मखरे,नगराध्यक्ष समीरभाई मुलांनी,संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल, शिवस्मारक मंडळाचे संस्थापक बाबासाहेब गवळी, मक्का मजिद सदर वाहिदभाई शेख,आनंद रजपूत,अर्जुन गाडे, भाऊसाहेब कांबळे ,भूषण लंकेश्वर,सागर गवळी, फय्याज शेख तुकाराम राऊत, डॉ. मोहसीन मकनू ची भाषणे झाली.
यावेळी या आंदोलनामध्ये जामा मजीत सदर नासिर दाळवाले, मक्का मस्जिद नायब सदर वाजिद भाई कुरेशी मदिना मज्जित सदर शिराज शेख गुलशन ए रजा मज्जिद दादा अकबर शेख, मोहम्मदिया मज्जित युसुफ बागवान, वली मोहम्मद मुलानी ,युवा नेते वसीम मुलानी, जमीर मुलानी, नगरसेवक संजय गोरे, निवृत्ती गोरे, सरताज शेख,अखलाक दाळवाले, इर्षद कुरेशी, सोहेल आतार,सचिन वाळके,जितेंद्र गायकवाड, हमीद शिकलकर ,जाफर शेख मुस्ताक पठाण यासीन शेख, सादिक बहामंद, मुन्ना शेख आयुब बागवान,युसुफ दाळवाले, इम्रान चौधरी,यासह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती.

No comments:
Post a Comment