लोकमंगल शुगर इथेनाँल अँन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीज लि, भंडारकवठे कारखान्याचा रु.2525 जिल्ह्यातील उच्चांकी ऊस दर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 22, 2019

लोकमंगल शुगर इथेनाँल अँन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीज लि, भंडारकवठे कारखान्याचा रु.2525 जिल्ह्यातील उच्चांकी ऊस दर

लोकमंगल शुगर इथेनाँल अँन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीज लि, भंडारकवठे कारखान्याचा रु.2525 जिल्ह्यातील उच्चांकी ऊस दर

लोकमंगल शुगर इथेनाँल अँन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीज लि, भंडारकवठे ता.द.सोलापूर कारखान्याचा गळीत हंगाम 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गाळपास आलेल्या व येणा-या ऊसास एकरकमी प्रति टन रु.2525 उच्चांकी ऊस दर जाहीर करण्यात आला आहे. लोकमंगल उद्योग समुहाचे संस्थापक, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष बापु देशमुख, कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली लोकमंगल शुगर इथेनाँल अँन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीज लि, साखर कारखाना यशस्वापणे चालत आहे. कारखान्याचे आज अखेर 90955 मे.टन गळीत झाले आहे. कारखान्याने शेतकरी हिताचा निर्णय घेवुन सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम दि.27.11.2019 रोजी पासुन सुरु झाला असुन प्रति रु.2200/- प्रमाणे दि.10.12.2019 रोजी पर्यंत गळीतास आलेल्या ऊसाचे बिल शेतक-यांच्या खातेवर जमा करण्यात आले आहे. कारखान्याकडे ऊस तोडणी वहातुकीचे काम करणा-या तोडणी वहातुक ठेकेदारांचे दर पाच दिवसाला कमीशन डिपाँझिटसह तोडणी वहातुकीचे बिल वाटप करण्यात येत आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची शुक्रवार दि.20.12.2019 रोजीचे मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी रु.2525 दर देण्याचा निर्णय झाल्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.मनिष देशमुख यांनी जाहीर केले. दि.30.11.2019 पर्यंत ऊस बिलाची फरक रक्कम प्रति टन रु.325 प्रमाणे शेतक-यांच्या खातेवर जमा करण्यात आली आहे. कार्यकारी संचालक मनिष देशमुख यांचे हस्ते शेतक-यांना रु.325 फरक बिलाचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक मनिष देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, यापुढे शेतकरी, वाहन मालक व कामगार यांना कारखान्याचा केंद्रबिंदु मानुन त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कारखाना प्रयत्नशील राहिल. दुष्काळी परिस्थीती, अवकाळी पाऊस यामुळे शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले आहे ते भरुन काढण्यासाठी कारखानदारी अडचणीत आली असताना सुध्दा शेतक-यांना जास्तीत-जास्त ऊस दर देण्याची भुमिका कारखान्याने घेतली आहे.
                          यापुढेही कारखाना सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेईल. तरी सर्व शेतकरी बंधुनी कारखान्याकडे जास्तीत-जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक मनिष देशमुख व संचालक पराग पाटील यांचा जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर दिल्यामुळे सत्कार केला. तसेच सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी कारखाना गेटसमोर व कार्यक्षेत्रातील गावोगावी फटाके उडवुन आनंद व्यक्त केला. यावेळी संचालक पराग पाटील, प्रेसिडेंट टेक्निकल मोहन पिसे, मुख्य शेती अधिकारी राजाभाऊ खटके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र सारवडे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुनिल बिराजदार, ऊस उत्पादक शेतकरी अमोगसिध्द आण्णाराव अजावडरे, धरेप्पा रंगनाथ बळक्षेत्री, तुकाराम पिराप्पा भरले, संगाप्पा बसाण्णा तेली तसेच विजयकुमार शहा, भालचंद्र नवले, मुत्याप्पा बबलेश्वर, भिमाशंकर बबलेश्वर, श्रीशैल पाटील, शिवशंकर रामपुरे, सिध्दाराम मेडीदार, सिध्दाराम तावसे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages