महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 22, 2019

महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा

महिला अत्याचार विरोधी कृती  समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा 

करमाळा  ( प्रतिनिधी ): महिलांवरील वाढता अत्याचार व हिंसाचारा च्या विरोधात तातडीने प्रतिबंधक पावले उचलणे याबाबत महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना अॅड सविता शिंदे म्हणाल्या की, 
 मागील काही दिवसांपासून महिलांविरोधातील हिंसा व गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. बलात्कार, विनयभंग यासारख्या गुन्ह्यांमुळे देशभरातील महिलांमध्ये भीतीचे व  असुरक्षिततेचे वातावरण आहे. महिलांविरोधातील गुन्हे व गुन्हेगारांविरुद्ध त्वरित तपास होऊन होऊन पोलिसांनी पुरेसे पुरावे न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. परंतु अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील योग्य तो तपास होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्वरित तपास करून न्यायालया द्वारा गुन्हेगारांना शिक्षा मिळणे आवश्यक आहे. तपास व खटला चालून निकाल देण्याचा कालावधी कमीत कमी असला पाहिजे.
दुसरीकडे स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याची समाजाची मानसिकता अजूनही अस्तित्वात असल्यामुळेही पुरुषांकडून महिलांच्या  विरोधात गुन्हे घडताना दिसतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
स्त्रियांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्ताने घराबाहेर पडणे आवश्यक झाले आहे. शिवाय स्त्रियांचा स्वतंत्रपणे सन्मानाने जीवन जगण्याचा घटनादत्त अधिकार अबाधित राहणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्त्रियांना कुठल्याही वेळी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटेल असे वातावरण व सुरक्षिततेचे सर्व उपाय सरकारने करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही पुढील मागण्यांसाठी निवेदन सादर करत करण्यात आले महिलांवरील अत्याचाराचा व हिंसेचा तपास व न्यायालयीन खटले १०० दिवसात पूर्ण केले जावेत. अत्याचार पीडित महिलांना व साक्षीदारांना संरक्षण पुरवले जावे शाळा, महाविद्यालय, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सिनेमागृहे इत्यादी सर्व सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षिततेचे उपाय केले जावेत उदा.  सर्वत्र  पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, महिलांसाठी २४ तास मदतकेंद्र सुरू ठेवणे,  सार्वजनिक ठिकाणी महिला पोलीस व पुरुष पोलिसांची उपस्थिती राखणे इ.निर्भया निधीचा उपयोग योग्य तर्हेने, अत्याचार पीडित महिला व महिला सुरक्षिततेसाठी केला जावा. शाळा महाविद्यालयातील शिक्षण, सरकारी कार्यालयांमार्फत व इतर सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे महिलांना समतेची वागणूक देण्याबाबत व हिंसाचारविरुद्ध प्रबोधन करण्यावर भर दिला जावा.अशा वरील सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. अन्यथा तिव्र मोर्चा काढण्यात येईल अशा शिंदे म्हणाल्या.  यावेळी  कीर्ती रोकडे, वैष्णवी शिंदे, नामदेवराव जगताप आद्यपक विद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अश्या शेकडो महिला रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. रॅली तहसील कार्यालयासमोर  आल्यानंतर महिलांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी निवेदन स्वीकारले.ॲड. सविता शिंदे,  डॉ. सुनीता दोशी, नलिनी जाधव, माधुरी साखरे, माया भागवत, प्रा. सरला चव्हाण, मंजू देवी, प्रा. संध्या बिले, माधुरी परदेशी, प्रा. मुक्ता महाडिक, पूजा दोशी, प्रा. मुक्त महाडिक, सुप्रिया येवले, प्रा. नीता जाधव, प्रा. सुरेखा जाधव, अनिता देशमुख, ऐश्वर्या दोशी, काजल दोशी, विजय कर्णवर, शारदा सुतार, जनाबाई पवळे, उज्ज्वला देवी, शलाका दोशी, माया भागवत, गीता कापडी, चारू देवकर, कालिंदी झेंडे, विजय जाधव, प्रजवला दोशी, पुष्पा जाधव, मोहिनी कन्हेरे, अनुजा शिंदे, माधवी दोशी, स्वाती माने, राजश्री माने, स्नेहा गांधी, विजय जाधव आदी उपस्थित होतेे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages