Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय शाहिरी परिषद भरवावी- शितलदेवी मोहिते-पाटील

सर्वांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय शाहिरी परिषद भरवावी-  शितलदेवी मोहिते-पाटील

अकलूज( प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक होते. त्यांनी ४० हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या तर लोकनाट्य,  पोवाडे,  कथासंग्रह, नाटके, कित्येक गीते लिहिली असून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय शाहिरी परिषद भरवावी असे  मत जि.प.सदस्य शितलदेवी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
         मातंग एकता आंदोलन संघटना तालुका माळशिरस व  दयावान ग्रुप अकलूज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन अकलुज ग्रामपंचायत येथील सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी जि. प .  सदस्य शितलदेवी मोहिते-पाटील बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील होते तर पंचायत समिती सदस्य हेमलाता चांडोले, हसीना शेख, फातिमा पाठावाला, ग्रामपंचायत सदस्य जावेद बागवान विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
         पुढे बोलताना शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचा अभिमान वाटतो. यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते अण्णाराव खंडागळे, सोजर मस्के, अशोक कोर्टिकर, करुणा धाइंजे, राहुल चव्हाण, पांडुरंग जाधव, सिताराम रणदिवे, यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक हमीद मुलाणी यांनी केले तर सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सोमनाथ खंडागळे, सुधाकर बनसोडे, महेंद्रसिंग साठे यांनी अधिक परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments