Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर

 राज्यातील 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 

निवडणुक कार्यक्रम जाहीर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या निवडणुकांमधून ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५

मतदान दिवस २ डिसेंबर २०२५

मतमोजणी ३ डिसेंबर २०२५

निवडणुकीची व्याप्ती

एकूण नगरपरिषदा: २४६ (यात १० नवनिर्मित आणि २३६ मुदत संपलेल्या नगरपरिषदांचा समावेश)एकूण नगरपंचायती: ४२ (यात १५ नवनिर्मित आणि २७ मुदत संपलेल्या नगरपंचायतींचा समावेश)

निवड होणार: ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष

मतदार संख्या: १ कोटी ७ लाख

मतदान केंद्रे: १३,३५५

मतदार याद्या: मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील. मतदार यादी तपासण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर ‘सर्च फॅसिलिटी’ उपलब्ध असेल.

दुबार मतदारांवर नजर: ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष स्टार व्यवस्था असेल. एकदा मतदान केल्यास स्टार दिसेल, अधिक स्टार दिसल्यास दुसऱ्या मतदान केंद्रावर मत देता येणार नाही.

नगरपरिषद: निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनुसार होईल. एका प्रभागात साधारणपणे २ जागा (विषम संख्या असल्यास ३ जागा) असतील. मतदारांना २-३ सदस्यांसाठी मतदान करावे लागेल.नगरपंचायत: १ सदस्य व १ अध्यक्ष असतो, त्यामुळे मतदारांना दोन मते द्यावी लागतील.

या घोषणेमुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments