माळशिरस तालुक्यातील तरुणांचा लोकसेवा परीक्षेत चौकार
नातेपुते (कटूसत्य वृत):- प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वास, सातत्य आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कुठलेही ध्यये गाठणे अशक्य नाही. हे माळशिरस तालुक्यातील खेडेगावातील ग्रामीण भागातील तरुणांनी २०२४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत माळशिरस तालुक्यातील तरुणांनी यशाचा चौकार मारला असून त्या चार विद्यार्थ्यांचे माळशिरस तालुक्यामध्ये कौतुक होत आहे. यामध्ये गिरवी ता. माळशिरस येथील दिपाली शिवाजी खरात यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त करून सहाय्यक राज्यकर आयुक्त (गट-अ) या पदी निवड, फोंडशिरस ता. माळशिरस येथील काजल विलास भोसले ( राजपत्रित वर्ग -१ ) मध्ये निवड, गोरडवाडी ता.माळशिरस येथील प्रदिप गोरड यांची ( राजपत्रित वर्ग -१ ) या पदी निवड,माणकी ता. माळशिरस येथील सागर केशव रणनवरे ( राजपत्रित वर्ग -१ ) मध्ये निवड झाली आहे. वरील चौघांनी मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून इतर विद्यार्थ्यांसमोर वरील चौघांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे माळशिरस तालुक्यामधून शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील प्रशासकीय कार्यकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments